Union Budget 2025 CM Devendra Fadnavis reaction on budget


नव्या कररचनेमुळे मोठं इनकम मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे. हे इनकम खर्च केल्यामुळे देशातील डिमांड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यातून फायदेशीर असे की, देशात रोजगार निर्मित व्हायला फायदा होणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य केलं.

मुंबई : नव्या कररचनेमुळे मोठं इनकम मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे. हे इनकम खर्च केल्यामुळे देशातील डिमांड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यातून फायदेशीर असे की, देशात रोजगार निर्मित व्हायला फायदा होणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य केलं. (Union Budget 2025 CM Devendra Fadnavis reaction on budget)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांचं आभार मानतो. मध्यमवर्गीयांसाठी त्यांनी स्वप्नपूर्ती होणारे बजेट सादर केलं आहे. अपेक्षे पेक्षा अधिक म्हणजे Income Tax ची लिमीट ही सहा लाखांवरून 12 लाखांवर नेली आहे. त्यामुळे 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. या नव्या कररचनेचा मोठा फायदा मध्यमवर्गीय, नोकरदार, नव तरुणांना होणार आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“या नव्या कररचनेमुळे मोठं इनकम मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे. हे इनकम खर्च केल्यामुळे देशातील डिमांड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यातून फायदेशीर असे की, देशात रोजगार निर्मित व्हायला फायदा होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये अतिशय धीराने घेतलेला हा निर्णय आहे. तसेच, भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरेल, असे मला वाटतं”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“यासोबत शेती क्षेत्रात 100 जिल्ह्यांचं सर्वेक्षण करून शेती विकासाची मोठी योजना राबवण्याची योजना असेल. तेलबियांच्या संदर्भात पहिल्यांदाच केंद्र सरकारने घोषणा केली आहे की, शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देण्याकरीता फायदा होणार आहे. शेती क्षेत्रात विविध प्रकरांची गुतवणूक सुद्धा सरकारने जाहीर केली आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“MSME च्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होणार आहे. MSME हे सर्वाधिक रोजगार देणार क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे. महाराष्ट्र आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालं आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक रोजगार निर्मिती होते आहे. याचा तरुणांना व नव्या स्टार्टअप्सना फायदा होणार आहे”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – Sanjay Raut : ईव्हीएम घोटाळ्याबाबत राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घ्यावी अन् संवाद जनतेसमोर मांडावा – संजय राऊत



Source link

Comments are closed.