विक्रमी शतक ठोकणारा अभिषेक ठरला सामनावीर, या खेळाडूने जिंकला मालिकावीरचा किताब

IND vs ENG; इंंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तुफानी विक्रमी शतक झळकावणारा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माला या टी20 सामन्यासाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने फक्त 37 चेंडूत शतक पूर्ण केले. तो भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाजही बनला. सुरुवातीपासूनच अभिषेक शर्माने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांवर हल्ला केला. तसेच जर आपण प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्काराबद्दल बोललो तर हा किताब फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने जिंकला.

या सामन्यात अभिषेक शर्माने 54 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकारांसह 135 धावांची खेळी केली. या डावात त्याचा स्ट्राईक रेट 250 होता. अभिषेक शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. ज्याने एका टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 13 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा आतापर्यंत 10 षटकारांसह अव्वल स्थानावर होता. पण आता अभिषेकने त्याला मागे टाकले आहे. मात्र, भारताकडून सर्वात जलद शतक अजूनही रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 35 चेंडूत हे यश मिळवले, तर अभिषेक शर्माने 37 चेंडूंचा सामना केला. या सामन्यात तो कोणत्याही जर आणि पण प्रश्नांशिवाय तो सामनावीर ठरला.

मालिकावीर पुरस्काराबद्दल बोलायचे झाले तर हा पुरस्कार मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने जिंकला. वरुण चक्रवर्तीने या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे त्याने मालिकेत एकूण 14 विकेट्स घेतल्या. त्याने प्रत्येक सामन्यात किमान दोन विकेट घेतल्या आहेत. त्याने एका सामन्यात पाच विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या अशा दमदार गोलंदाजीचे बक्षीस त्याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन मिळाले. त्याने पाच सामन्यांमध्ये एकूण 18 षटके गोलंदाजी केली ज्यात 14 विकेट्स घेतल्या. या मालिकेत इतर कोणत्याही गोलंदाजाला 10 विकेट्सही मिळाले नाहीत.

हेही वाचा-

युवराजनंतर आता अभिषेक शर्मा इंग्लंडचा नवा ‘नाइटमेयर’..! एकाच सामन्यात रचले इतके विक्रम
टी20 वर्ल्डकप जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, बीसीसीआयची मोठी घोषणा
Maharashtra Kesari Winners List: आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांची यादी

Comments are closed.