IND vs ENG: वानखेडेवर विक्रमांची मालिका, टीम इंडियाचा इंग्लंडला दे धक्का…..

India vs England 5th T20 Record at Wankhede Stadium: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 150 धावांनी विजय मिळवला आणि विक्रमांची मालिका रचली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 बाद 247 धावा केल्या आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा संघ 10.3  षटकांत 97 धावांवर गारद झाला. तर चला जाणून घेऊया या सामन्यात आणि टीम इंडियाच्या विजयात कोणते विक्रम मोडले आणि रचले गेले.

टी20 मधील दुसरा सर्वोच्च विजय (पूर्ण सदस्य)

168 धावा भारत विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, 2023
150 धावा भारत विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
143 धावा पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, कराची, 2018
143 धावा भारत विरुद्ध आयर्लंड, डब्लिन, 2018
137 धावा इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, बासेटेरे, 2019
135 धावा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग 2024

भारताचे सर्वाधिक पॉवरप्ले स्कोअर (टी२० मध्ये)

95/1 विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
82/2 विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, 2021
बांगलादेश विरुद्ध 82/1, हैदराबाद, 2024
78/2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग, 2018

टी20 मध्ये चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद शतक (पूर्ण सदस्य)

35 चेंडू डेव्हिड मिलर विरुद्ध बांग्लादेश, पॉचेफस्ट्रूम, 2017
35 चेंडूत रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर, 2017
37 चेंडू अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
39 चेंडू जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2023
40 चेंडू संजू सॅमसन विरुद्ध बांग्लादेश, हैदराबाद, 2024

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक शतके

13 षटकार अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
10 षटकार रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर, 2017
10 षटकार संजू सॅमसन विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डर्बन, 2024
10 षटकार तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग, 2024

आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारताचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

135 अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
126* शुबमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, 2023
123* ऋतुराज गायकवाड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गुवाहाटी, 2023
122* विराट कोहली विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई, 2022
121* रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, बेंगळुरू, 2024

या सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने 54 चेंडूत 7 चौकार तसेच 13 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना अभिषेक शर्माने 1 षटकात 3 धावा देऊन 2 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा-

विक्रमी शतक ठोकणारा अभिषेक ठरला सामनावीर, या खेळाडूने जिंकला मालिकावीरचा किताब
टी20 वर्ल्डकप जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, बीसीसीआयची मोठी घोषणा
युवराजनंतर आता अभिषेक शर्मा इंग्लंडचा नवा ‘नाइटमेयर’..! एकाच सामन्यात रचले इतके विक्रम

Comments are closed.