'आम्हाला निर्भय क्रिकेट….', सामन्यानंतर हेड कोच गाैतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया

सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर हेड कोच गाैतम गंभीरने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. कारण टीम इंडियाला मार्यादित क्रिकेटच्या फाॅरमॅटमध्ये यश मिळाले आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला आहे. या विजयानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, आम्हाला सामना हरण्याची भीती नाही. आम्हाला 250-260 धावा करायच्या आहेत. जरी या दरम्यान आम्ही 120 धावांवर बाद झालो तरी वाईट वाटणार नाही.

सामना संपल्यानंतर बोलताना प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला, “इंग्लंड हा एक अतिशय उच्च दर्जाचा संघ आहे. आम्हाला सामना गमावण्याची भीती बाळगायची नव्हती. आम्हाला 250-260 धावसंख्या गाठायची आहे. पण कधीकधी आम्ही 120 धावांवरही बाद होतो, पण आम्ही योग्य मार्गावर आहोत. आम्हाला हेच काम करायचे आहे. आम्हाला निर्भय क्रिकेट खेळायचे आहे. आपल्याला अभिषेक शर्मासारख्या खेळाडूंना पाठिंबा द्यायचा आहे. आपल्याला या मुलांशी धीर धरावा लागेल, त्यांना पाठिंबा देत राहणे महत्त्वाचे आहे. त्यापैकी बहुतेक मुले निर्भय क्रिकेट खेळण्याच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतात.”

तो पुढे म्हणाला, “140-150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध मी यापेक्षा चांगले टी20 शतक (अभिषेकचे शतक) पाहिले नाही. जेव्हा निकाल तुमच्या बाजूने जाऊ लागतात तेव्हा सर्वकाही व्यवस्थित होते. आमच्या खेळाडूंना 140-150 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्याचा अर्थ काय आहे हे माहित आहे.”

अभिषेकबद्दल बोलायचे झाले तर त्याने या सामन्यात फलंदाजी करताना 54 चेंडूत 7 चौकार तसेच 13 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना अभिषेक शर्माने 1 षटकात 3 धावा देऊन 2 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा-

IND vs ENG: वानखेडेवर विक्रमांची मालिका, टीम इंडियाचा इंग्लंडला दे धक्का…..
विक्रमी शतक ठोकणारा अभिषेक ठरला सामनावीर, या खेळाडूने जिंकला मालिकावीरचा किताब
युवराजनंतर आता अभिषेक शर्मा इंग्लंडचा नवा ‘नाइटमेयर’..! एकाच सामन्यात रचले इतके विक्रम

Comments are closed.