Photo – मराठीतील ट्रान्सजेंडर अभिनेत्री प्रणित हाटेनी बांधली लग्नगाठ…
मराठी सिनेसृष्टीतील प्रथम ट्रान्सजेंडर अभिनेत्री प्रणित हाटे हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. प्रणितने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने नवीन सुरुवात अशी कॅप्शन टाकत प्रणितने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा चाहत्यांशी शेअर केला आहे.
प्रणित ही सोशल मीडीयावर कायम चर्चेतील नाव राहिलेली आहे. लग्नाचे फोटो प्रणितने शेअर केले असले तरी, प्रणितने पतीची ओळख मात्र लपवली आहे. त्यामुळेच आता हे खरं लग्न आहे की, कुठल्या नव्या मालिकेच्या प्रमोशनची तयारी असा प्रश्न प्रणितच्या चाहत्यांना पडला आहे.
Comments are closed.