अशोक चव्हाणांनी ते भाजपचेच नेते आहेत का? हे तपासावं, प्रताप पाटील चिखलीकरांचा टोला
अशोक चवनवरील प्रताप पाटील चिखलिकर: नांदेडमध्ये स्वबळावरुन भाजपा आणि शिवसेनेत कुजबुज सूरु असल्याचं चित्र पाहायला मिळतच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यावर शिवसेना नेत्यांनी टीका केली होती. अशातच आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनंही उडी घेतली आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का? हे आधी त्यांनी तपासावे आणि मग स्वबळाचा नारा द्यावा असा टोला चिखलीकरांनी लगावला.
कुणात जर खुमखुमी असेल स्वतंत्र लढण्याची तर राष्ट्रवादी देखील तयार
खसादार अशोक चव्हाण यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का? हे आधी त्यांनी तपासावे आणि मग स्वबळाचा नारा द्यावा अशी टीका त्यांनी केली आहे. आम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून एकत्र आहोत. महायुतीच्या निर्णयाला बांधील आहे. पण कुणात जर खुमखुमी असेल स्वतंत्र लढण्याची तर राष्ट्रवादी देखील तयार असल्याचे चिखलीकर म्हणाले. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद असल्याचे चिखलीकर म्हणाले. आम्ही स्वतःहून युती धर्म तोडणार नाही. आम्ही युती धर्म जोपासणारी माणसं आहोत. जी माणसं युतीचा धर्म जोपासणार नाहीत, तेव्हा बघू अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
नांदेड शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट करीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी काळात नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.