डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासह मेक्सिकोवर टॅरिफ लादले, अमेरिकेचे नागरिकचं संकटात, महागाई वाढणार?
<एक शीर्षक ="नवी दिल्ली" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/new-delhi" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारताच इतर देशांना इशारे देण्यास सुरुवात केली. टॅरिफ लादत एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरु केलं आहे.टॅरिफ लादून अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. जगातील जाणकारांच्या मते टॅरिफ लादून डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या देशांसह अमेरिकन नागरिकांना देखील अडचणीत आणत आहेत.
अमेरिकेच्या नव्या टॅरिफ वॉरमुळं अमेरिकन ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्यामध्ये टोमॅटो, एवोकाडे आणि टकीला यासाठी अधिक रक्कम द्यावी लागेल. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडामधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर नव्यानं टॅरिफ लावणं हे आहे. सध्या अमेरिकन जनता पहिल्यापासून महागाईनं त्रस्त आहे, निवडणुकीच्या काळात त्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.
फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेचे तीन प्रमुख व्यापारी भागीदार चीन, मेक्सिको आणि कॅनडा आहे. या तीन देशांसोबत अमेरिकेचा 40 टक्के व्यापार होतो. अमेरिकेत टकीला या पेयाला मोठी मागणी असते. मेक्सिको आणि कॅनडा टोमॅटो, एवोकाडो सह इतर उत्पादनं पुरवतात. 2019 ते 2021 मध्ये अमेरिकेत 90 टक्के एवोकाडो मेक्सिकोतून आयात झालं होतं. ट्रम्प यांनी या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावल्यास त्याचा थेट भार अमेरिकन नागरिकांवर होणार आहे.
या वस्तूंच्या किमती वाढणार
अमेरिका चीनमधून दरवर्षी अब्जावधी डॉलर रकमेची उपकरणं आणि मशिनरींची आयात करते. ज्याचा वापर टीव्ही, स्मार्टफोन आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये केला जातो. अमेरिकेनं टॅरिफ लादल्यास चीनकडून देखील पलटवार केला जाऊ शकतो. मेक्सिको आणि कॅनडानं पलटवार केला आहे. कॅनडानं अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या 1256 वस्तूंवर टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. त्यामध्ये पोल्ट्री, डेअरी उत्पादक, ताजी फळं, भाषा, लाकूड, पेपर उत्पादन, इलेक्ट्रॉनिक साहित्याचा समावेश आहे.टॅरिफ वॉरमुळं दुसऱ्या देशांसोबत अमेरिकेच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यानंतर टॅरिफ लावत अमेरिकेला मजबूत करण्याचा मार्ग स्वीकारल्यानं जगभरातील गुंतवणूक अमेरिकेकडे आकर्षित होऊन डॉलर मजबूत झाला. याचा परिणाम इतर देशांवर देखील होत आहे. जगभरातील इतर चलनांमध्ये घसरण झाल्यानं त्यांना अमेरिकेशी व्यापार करताना अधिक रक्कम मोजावी लागेल. त्यामुळं येत्या काळात अमेरिकेच्या व्यापारावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम कसा होतो ते पाहावं लागेल.
इतर बातम्या :
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/gold-rate-and- आणि silver-pice-on- 3-februber-2025-check-lates-rates-in-Mumbai-and-Others-1342223">Gold Rate : बजेटनंतर सोन्याच्या दरात वाढ की घसरण? चांदीनं 1 लाखांचा टप्पा ओलांडला, मुंबईसह विविध शहरात दर किती रुपयांवर?
Comments are closed.