नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहिलीनगर:संतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी(Namdeo Shastri) उडी घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे . गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात वाल्मीक कराडशी निकटचे आणि आर्थिक संबंध असल्याचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय .दरम्यान, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे निर्दोष असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) हा जातीयवादाचा अंक असल्याचा आरोप केला होता .आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्री यांनी वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. नामदेव शास्त्रींनी त्यांचे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याने मराठा समाज आक्रमक
भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती मराठा कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना केली आहे . महंत व नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं या निवेदनात म्हटलंय .मराठा समाजाच्या भावना त्यांच्या वक्तव्यामुळे तीव्र झाल्या आहेत .त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे .हे वक्तव्य त्यांनी मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे असेही या निवेदनात म्हंटलंय .
काय केलेत आरोप?
- भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात मराठा समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
- नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यात करण्यात आलाय.
- धनंजय मुंडेंना पाठींबा देऊन दोन समजात तेढ निर्माण करत असल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे.
- नामदेव शास्त्री यांनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मराठा समाजाची मागणी केली असून नामदेव शास्त्री यांच्या करावाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.
- नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंना पाठींबा दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.
- धनंजय मुंडेंना पाठींबा देऊन दोन समजात तेढ निर्माण करत असल्याचा मराठा समाजाचा आरोप या निवेदनात म्हटले आहे.
जातीयवादाचा नवा अंक : मनोज जरांगे
दरम्यान ‘स्वतःची चूक झाकणासाठी डीवचू नका,तुमच्याकडून चूक झाली आहे.समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे.धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक पाहायला मिळाला.आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले.ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो’ असं मनोज जरांगे रविवारी म्हणाले होते.त्यानंतर आज मराठा कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडे नामदेव शास्त्रींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले आहे .
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.