कर्णधार सूर्याची कामगिरी अतिउत्तम, पण फलंदाज म्हणून लज्जास्पद रेकाॅर्ड, पाहा आकडेवारी
जोपर्यंत सूर्यकुमार यादव विराट कोहली, रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाकडून खेळत होता. तोपर्यंत तो मिस्टर 360 च्या शैलीत दिसत होता. मात्र, सूर्याची चमक त्याच्याच कर्णधारपदाखाली कमी झाली आहे. सूर्यकुमार यादवची फलंदाजी खराब आहे. काल रविवारी संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव कर्णधार होता. कर्णधार म्हणून त्याने मालिका 4-1 अशी जिंकली. पण फलंदाज म्हणून तो पूर्णपणे अपयशी ठरला. तो मालिकेत फक्त 28 धावा करू शकला. जो एक लज्जास्पद विक्रम आहे.
सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांमध्ये फक्त 28 धावा केल्या, जी एका मालिकेतील भारतीय कर्णधाराची सर्वात वाईट कामगिरी आहे. गेल्या वर्षी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन डावात 26 धावा करू शकला होता. पण यावेळी तो 5 डावात फक्त 28 धावा करू शकला. या मालिकेत त्याची सरासरी 5.60 होती. याआधीही सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून टी20 मालिकेत सर्वात कमी सरासरी नोंदवली होती. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 8.66 च्या सरासरीने धावा केल्या. अशाप्रकारे त्याचा रेकॉर्ड आणखी वाईट झाला आहे.
या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14.33 च्या सरासरीने 43 धावा केल्या. सूर्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवणे चांगले राहिले आहे. परंतु त्याने फलंदाजीने निराशा केली आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत असो किंवा चौथ्या क्रमांकावर, तो प्रत्येक वेळी अडचणीत सापडला आहे. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा त्याच्या नेतृत्वाखाली मजबूत कामगिरी करत सातत्याने धावा करत आहे.
हेही वाचा-
टीम इंडियाच्या या खेळाडूंना विश्रांती नाही, टी20 नंतर आता वनडेतही खेळणार
कॅप्टन सूर्या देखील अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीचा फॅन, म्हणाला, ‘त्याची खेळी पाहणे मजेदार….
भारत तर सोडा इंग्लंड संघ एकट्या अभिषेक शर्माकडून हरला, पाहा आकडेवारी
Comments are closed.