Ajit Pawar reacts on Maharashtra Kesari 2025 final match giving best wishes to winner


महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याला विजयी करण्यात आले. पण या स्पर्धेत झालेल्या वादामुळे या स्पर्धेला गालबोट लागले. यानंतर स्पर्धेला उपस्थित असणाऱ्या अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली. या सामन्यात महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हा 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. पण या स्पर्धेत प्रतिस्पर्धी कुस्तीपटू, दोन वेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचाला मारहाण केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत आता त्या ठिकाणी उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar reacts on Maharashtra Kesari 2025 final match giving best wishes to winner)

महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याला विजयी करण्यात आले. पण या स्पर्धेत झालेल्या वादामुळे या स्पर्धेला गालबोट लागले. पंचांनी मॅट विभागाच्या उपांत्य फेरीमध्ये दिलेला निकाल चुकीचा असल्याचे म्हणच राक्षेने थेट पंचाच्या थातीत लाथ घातली. तर दुसरीकडे कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याने सुद्धा मैदान सोडून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यावेळी या ठिकाणी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार फार काही बोलले नाही. पण त्यांनी X या सोशल मीडिया साइटवर याबाबतची पोस्ट करत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून विजेता पृथ्वीराज मोहोळ याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा… Prithviraj Mohol : पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी, गोंधळानंतर महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान

अजित पवारांची पोस्ट…

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अजित पवारांनी म्हटले की, “अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ‘महाराष्ट्र केसरी 2025’ स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रसंगी उपस्थित राहिलो. या स्पर्धेत पुण्याचा सुपुत्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला, मानाची गदा जिंकली. या उत्तुंग यशाबद्दल मी पृथ्वीराजचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. यासारख्या रोमांचक खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीचं जतन केलं जातंय, याचं समाधान वाटतं. त्याचप्रमाणे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देखील मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला पृथ्वीराजचा सार्थ अभिमान आहे. @mohol_murlidhar @bharanemamaNCP @sangrambhaiya @RamShindeMLA”

यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले. मॅट विभागाचा उपांत्य फेरीचा सामना नांदेडचा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडला. पण या लढतीच्या निकालावरुन जोरदार राडा झाला. पंचांनी शिवराज राक्षे चितपट झाल्याचा निर्णय दिला. पण हा निकाल मान्य नसल्याचे म्हणत राक्षेने रिप्ले दाखवण्याची मागणी केली. पण पंचांनी त्याची मागणी धुडकावून लावल्यानंतर राक्षेने पंचांशी हुज्जत घातली. मात्र यादरम्यान त्याचा तोल सुटला आणि त्याने थेट पंचांवर लाथ उगारली. यानंतर शिवराज राक्षे आणि खेळ सुरू असताना मैदान सोडून जाणाऱ्या महेंद्र गायकवाड या दोघांवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुस्तीगीर संघटनेकडून या दोन्ही पैलवानांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.



Source link

Comments are closed.