Stock Market – शेअर बाजारात पडझड सुरुच; सेन्सेक्स 319 अंकांनी कोसळला, निफ्टीचीही घसरण

केंद्रिय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजार उसळी घेईल, या आशेवर असणाऱ्या गुंतवणूकदारांचा आजही हिरमोड झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या काही धोरणांमुळे बाजारात सातत्याने घसरण होत असून आजही शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 319.22 अंकांनी पडला असून 77,186.74 या अंकांवर स्थिरावला आहे. निफ्टी 121.1 अंकांनी घसरून असून 23,361.05 अंकांवर स्थिरावला आहे.

शेअर बाजारात पडझड सुरुच असून त्याचा काही स्टॉक्सवर परिणाम झाला आहे, तर काही स्टॉक्समध्ये तेजी पहायला मिळाली. Bajaj Finance, Mahindra & Mahindra, Bajaj Finserv, Maruti Suzuki India, Bharti Airtel, Zomato या स्टॉक्समध्ये चांगली वाढ पहायला मिळाली. तर Power Grid Corporation of India, ITC, Asian Paints, Tata Motors, Hindustan Uniliver, Larsen And Turbo या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. तर निफ्टी 50 मध्ये Bajaj Finance, Shriram Finance, Mahindra & Mahindra, Wipro आणि Bajaj Finserv हे टॉप 5 स्टॉक्स तेजीत होते. तर दुसरीकडे Larsen & Toubro, Tata Consumer, Hero MotoCorp, Coal India and BEL हे पाच स्टॉक्स जोरदार कोसळले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी बाजारात तरळता (लिक्विडीटी) वाढवायची आहे. त्यासाठी त्यांनी धोरणे आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्रम्प निवडून येताच नोव्हेंबरपासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात विक्रीला सुरुवात केली असून ते सर्व पैसा अमेरिकेत फेडलरकडे आणि तेथील शेअर बाजारात गुंतवत आहेत. त्यामुळे शेअर बाजार गडगडला असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Comments are closed.