Kitchen Tips : कधीच खराब न होणारे पदार्थ

दर महिन्याला घरात न चुकता किराणा भरला जातो. किराणा भरताना बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना आपण त्यावरील मॅन्यूफॅक्चर आणि एक्सपायरी डेट बघतो. कारण खाण्यापिण्याच्या सर्वच गोष्टी वेळेनुसार खराब होतात. खराब पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. पण, स्वयंपाकघरात असे काही पदार्थ आहेत, जे कधीच खराब होत नाही. या पदार्थांना एक्सपायरी डेट नसते. पदार्थांची योग्यरित्या साठवणूक केल्यास हे पदार्थ वर्षानुवर्ष टिकतात. वेळेनुसार ना त्यांची चव बदलते ना हे पदार्थ खराब होतात. याशिवाय असे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. चला तर मग या लेखातून जाणून घेऊयात, अशा काही पदार्थांबद्दल ज्यांची एक्सपायरी डेट नसते.

तांदूळ –

योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास तांदूळ कधीच खराब होत नाही. यासाठी तांदूळ दमट हवामानापासून दूर ठेवावा आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवावा. जर तांदळाला ओलावा किंवा कीड लागली नाही तर तो वर्षानुवर्षे वापरता येतो.

साखर –

साखरेलाही एक्सपायरी डेट नसते. साखर कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास कधीच खराब होत नाही. थंड आणि जास्त प्रकाश नसेल अशा जागी ठेवाव्यात. यामुळे साखरेची शेल्फ लाइफ वाढते.

सोया सॉस –

सोया सॉसदेखील अनेक वर्षे टिकतो. सोया सॉसमध्ये जास्त प्रमाणात सोडियमचे प्रमाण असते, जे नैसर्गिकरित्या किटकांना वाढू देत नाही. सोया तुम्ही काचेच्या बरणीत साठवून ठेवू शकता.

मीठ –

मीठाला एक्सपायरी डेट नसते. फक्त तुम्ही मीठाला ओलसरपणापासून दूर ठेवायला हवे. कारण ओलावा पदार्थांत गेल्यास ते घट्ट होतात आणि त्याची चव बदलू शकते. त्यामुळे मीठ कोरड्या हवामानात आणि हवाबंद डब्यात ठेवायला हवे.

तूप –

प्रत्येकाच्या घरात आढळणारा तूप पदार्थ आहे. तूप वर्षानुवर्षे खराब होत नाही. फार पूर्वीपासून तूप बराचकाळ साठवून ठेवले जाते.

मध –

मध जितकं जुनं, तितकं फायदेशीर असते, असे म्हणतात. मधही खराब होत नाही. पण, आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आढळते. त्यामुळे मध खरेदी करताना अधिक काळजी घ्यावी.

व्हिनेगर –

लोणचं आणि विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी व्हिनेगर वापरले जाते. त्यामुळ व्हिनेगर कित्येकजणांच्या घरात आढळते. तुम्ही फ्रीजमध्ये व्हिनेगर ठेवल्यास जास्त काळ टिकते.

लोणचं –

लोणच्याची योग्यरित्या साठवणूक केल्यास लोणचं वर्षानुवर्ष खराब होत नाही. तुम्ही लोणचं दिर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात ठेवू शकता.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=rzjfwkwwwocu

Comments are closed.