भारताच्या शानदार विजयानंतर अमिताभ बच्चनने उडवली इंग्लंडची खिल्ली! व्हायरल पोस्ट एकदा पहाच

नुकतीच भारत-इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या (Suryakuamr Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा 4-1 असा धुव्वा उडवला. तत्पूर्वी दोन्ही संघात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) झंझावाती शतकामुळे भारताने हा सामना 150 धावांनी जिंकला. या विजयानंतर बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी इंग्लंडची मजा घेत एक पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “क्रिकेट.. भारत विरुद्ध इंग्लंड… धो धो धुतले, नाही नाही पछाडले. धोबी तलावातील गोऱ्या माणसाला क्रिकेट कसे खेळले जाते हे शिकवले, त्यांना 150 धावांनी हरवले.” आता अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबईत झालेल्या पाचव्या टी20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 150 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशाप्रकारे, भारतीय संघाने 5 सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. भारतीय संघाच्या विजयाचा खरा हिरो सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) होता. त्याने अवघ्या 54 चेंडूत 135 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 13 षटकार ठोकले. या शानदार खेळीसाठी अभिषेक शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर, वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.

आता भारत-इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका देखील खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ घोषित देखील करण्यात आला आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसेल. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला (6 फेब्रुवारी) पासून सुरूवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठे अपडेट समोर, चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणार की नाही?
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ स्टार फिरकीपटूला मिळाला ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार
ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धेत आरएफवायसी, ब्रदर्स स्पोर्टस असोसिएशन संघाची विजयी सलामी

Comments are closed.