IND vs ENG; रिंकू, हर्षितने नाही तर 'या' खेळाडूने जिंकला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणांचे पदक!

भारतीय क्रिकेट संघात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक देण्याची परंपरा सुरूच आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही याची अंमलबजावणी करण्यात आली. 24 वर्षीय ध्रुव जुरेलला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने प्रभावी क्षेत्ररक्षण केले. त्याने दोन सामन्यांमध्ये तीन झेल घेतले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका 4-1 ने जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडला 150 धावांनी पराभव पत्करावा लागला. अभिषेक शर्मा (135) च्या शतकाच्या जोरावर भारताने 247 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड संघ 97 धावांत ढेपाळला.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघ व्यवस्थापनाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. आज (03 फेब्रुवारी) बीसीसीआयने जुरेलला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओमध्ये, भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप कर्णधार सूर्याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक देण्याची विनंती करताना दिसत आहे.

शेवटच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमारने ‘शतकवीर’ अभिषेक शर्माचे कौतुक केले. तो म्हणाला, “अभिषेकची खेळी पाहणे मजेदार होते.” त्याचे कुटुंबही इथे उपस्थित आहे आणि मला खात्री आहे की सर्वांना त्याची खेळी पाहण्याचा आनंद झाला असेल.” सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या अभिषेकने 135 धावांच्या वादळी खेळीत 7 चौकार आणि 13 षटकार ठोकले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. टी20 मालिकेनंतर आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ज्यातील पहिला सामना 06 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. जो की नागपुरात खेळला जाईल.

हेही वाचा-

IPL 2025; संघाला मोठा धक्का, राॅयल्सचा कर्णधार गंभीर जखमी
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठे अपडेट समोर, चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणार की नाही?
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ स्टार फिरकीपटूला मिळाला ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

Comments are closed.