किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं, घरात बोलावून दिला ऑटोग्राफ!

भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. चाहते अनेकदा विराटची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात आणि जर विराट कोहली स्वतः तुम्हाला त्याच्या घरात बोलावून ऑटोग्राफ देईल तर? हे ऐकायला थोडं असामान्य वाटतंय. पण नेमके हेच काही चाहत्यांसोबत घडले, किंग कोहलीने चाहत्यांना त्याच्या गुडगावच्या घरात आमंत्रित केले.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोहलीने असे का केले? तर यामागील कारण जाणून घेतल्यानंतर, तुम्हीही विराटचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या गुडगाव येथील घरी होता. कोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती, तर काही चाहते रात्री उशिरापर्यंत भारतीय फलंदाजाच्या घराबाहेर होते. रात्री घरात उपस्थित असलेल्या चाहत्यांना पाहून विराट कोहलीने त्यांना घरात बोलावले आणि त्यांना ऑटोग्राफ दिले. किंग कोहलीच्या घरात ऑटोग्राफ घेण्यासाठी जाणाऱ्या चाहत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोहलीची ही शैली सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे.

विराट कोहली 2024-25च्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) दिल्लीकडून रेल्वेविरूद्ध खेळला होता. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामन्यात विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने आले होते. चाहत्यांची संख्या पाहून असे वाटले की, अरुण जेटली येथे रणजी सामना नाही, तर आंतरराष्ट्रीय सामना सुरू आहे. मात्र, कोहली या सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही. तो अवघ्या 6 धावांवर तंबूत परतला.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; रवींद्र जडेजा वनडे मालिकेत रचणार इतिहास, करणार हा भीमपराक्रम..!
3 भारतीय फलंदाज ज्यांनी टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये कमी डावात गाठला 2,500 धावांचा टप्पा
युनिव्हर्स बॉस पुन्हा क्रिकेट मैदानात परतणार, या टी20 स्पर्धेत खेळणार!

Comments are closed.