Sanjay Raut On Election Commision HC Notice To State and Central Election Commission of India
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या निवडणुकासाठी झालेल्या मतदानावर विरोधकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अशात आज (3 फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत झालेल्या मतांच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या निवडणुकासाठी झालेल्या मतदानावर विरोधकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अशात आज (3 फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत झालेल्या मतांच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला वाढीव मतदानाच्या पार्श्वभूमीवर नोटीस पाठवली आहे. यावरून आता विरोधकांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे. नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. (Sanjay Raut On Election Commision HC Notice To State and Central Election Commission of India)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “विधानसभेचा निकाल हाच कळीचा मुद्दा आहे. निकाल लागल्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक जाणकार हाच प्रश्न विचारत आहे की, शेवटच्या तासा-दोन तासात मतदान कसं वाढलं. वाढलेलं मतदान हाच मोठा घोटाळा आहे. आम्ही सगळे निवडणूक आयोगाकडे वारंवार गेलो, मात्र आम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगही देऊ शकलेलं नाही. निवडणूक आयोग एकच म्हणतं की, ऐसा हो सकता है… याचा अर्थ काय… 76 लाख मतं वाढतात कशी… आणि 76 लाख मतांची 150 मतदारसंघात विभागणी केली तर, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत. प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली”, असे म्हणत संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली.
याशिवाय, “या घोळातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकलं. हे सरकार सरळ मार्गानं आलेलं नाही. यामागे खूप मोठी पटकथा असून अनेक खलनायकांनी त्यात काम केलं आहे. उच्च न्यायालयानं विचारलेला प्रश्न हा जनता पण विचारत आहे. आम्हाला आमची लोकं सांगतात की, नाशिकमध्ये जे जिंकले त्यांनी विजय मिरवणूक काढली नाही. कारण त्यांना खात्रीच नाही की, आपण जिंकलो. तसेच, इतक्या लाखांच्या मतांनी आम्ही जिंकलो”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Maharashtra : वाढीव मतदानाचं गौडबंगाल! न्यायालयाची महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस
Comments are closed.