सॉवरेन गोल्डच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का? सरकार अंग काढून घेणार, स्वस्तात सोनं मिळवण्याचे
<एक शीर्षक ="नवी दिल्ली" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/new-delhi" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नवी दिल्ली : स्वस्तात सोनं खरेदी करण्याचा एक मार्ग म्हणून सॉवरेन गोल्ड बॉण्डकडे पाहिलं जातं. केंद्र सरकारनं एक निर्णय घेतल्यास सामान्य नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एकीकडे सोन्याचे दर वाढत असल्यानं खरेदीदारांची चिंता वाढली आहे. सरकारनं लवकरच एक निर्णय घेणार आहे त्यामुळं सर्व सामान्यंवर परिणाम होणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेबाबत विचारलं असता अर्थमंत्र्यांनी सरकार ही योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजना नेमकी काय?
आपण ज्या सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेची चर्चा करतोय ती योजना केंद्र सरकारनं 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात सोनं उपलब्ध करुन देण्याचा होता. या योजनेतून सरकार प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीऐवजी डिजीटल सोन्यामध्ये गुंतवणुकीवर भर दिला जायचा.
मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी चर्चा करताना म्हटलं की या योजनेत व्याज अधिक द्यावं लागत आहे. ज्यामुळं सरकारवरील बोजा वाढत आहे. यामुळं सरकार योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे
सॉवरेन गोल्ड बॉण्ड मुळं सरकारवरील आर्थिक भार वाढत असला तरी गुंतवणूकदारांना याचा फायदा होत होता. ही योजना गुंतवणूकारांसाठी फायदेशीर ठरली होती होती. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार या योजनेतून गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला होता. आता ही योजना सुरु ठेवणं सरकारसाठी अडचणीचं ठरल होतं.
सरकारकडून जरी गोल्ड बॉण्ड योजना बंद करण्यासाठी पावलं टाकली जात असली तरी सरकार दुसऱ्या नव्या योजनांवर विचार करत आहे. सोन्याच्या एक्सचें ट्रेडेड फंड आणि इतर वित्तिय उत्पादनांचा समावेश आहे. या योजना गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देतात.सरकारककडून सोन्याच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळं देशात सोन्याचे दर स्थिर राहतील.
दरम्यान, शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची निवड केल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचा दर काल 85300 रुपयांपर्यंत पोहोचला होता. चांदीच्या दरानं देखील 96000 चा टप्पा ओलांडला होता. त्यामुळं आता सोन्याचा दर किती रुपयांवर जाणार हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/photo-gallery/business/share-market-updates-sensex-and-nifty-including-nifty-today-relife-to-vestors-1342402">Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई
Comments are closed.