चीनही भिडला; अमेरिकेतील उत्पादनांवर 15 टक्के आयात शुल्क लादणार

चिनी मालावर दहा टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीनही आक्रमक झाला आहे. अमेरिकेतील विविध उत्पादनांवर 15 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची घोषणा चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आज केली. कोळसा, एलएनजी उत्पादने यांच्यावर 15 टक्के तर क्रूड तेल, कृषी उत्पादने आणि मोठी वाहने यांच्यावर दहा टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे.

चीनच्या उत्पादनांवर दहा टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी दोन्ही देशांमधील संबंधांबाबत तसेच द्विपक्षीय मुद्दय़ांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मेक्सिकोपाठोपाठ कॅनडावरील आयात शुल्कही महिनाभरासाठी थांबवले

मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या उत्पादनांवर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय महिनाभरासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टडो आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाडीया शेनबाम यांच्या विनंतीनंतर ट्रम्प यांनी महिनाभरासाठी आयात शुल्क थांबवण्याचे मान्य केले.

Comments are closed.