Forbes- 2025 List वाचा फोर्ब्सच्या यादीत हिंदुस्थानची पिछेहाट!!! पहिल्या दहामध्ये आहेत ‘हे’ देश

फोर्ब्सने जगातील १० सर्वात शक्तिशाली देशांची २०२५ ची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. तर चीनने फोर्ब्सच्या यादीत दुसरा क्रमांक पटकवला आहे. परंतु हिंदुस्थानची झालेली पिछेहाट हा एक महत्त्वाचा मुद्दा आता सर्वत्र चर्चिला जात आहे.

फोर्ब्सने स्पष्ट केले की ही यादी यूएस न्यूजने तयार केली आहे, ज्यामध्ये नेतृत्व, आर्थिक प्रभाव, राजकीय शक्ती, मजबूत आंतरराष्ट्रीय युती आणि लष्करी ताकद या पाच प्रमुख निकषांचा विचार केलेला आहे.  मजबूत अर्थव्यवस्था, शक्तिशाली लष्कर आणि प्रभावशाली आंतरराष्ट्रीय संबंध असूनही, हिंदुस्थान मात्र पहिल्या १० मध्ये स्थान मिळवू शकला नाही. या मध्ये १२ व्या क्रमांकावर असणारा हिंदुस्थान जागतिक जीडीपीच्या बाबतीत पहिल्या ५ मध्ये आहे.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश फोर्ब्सच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामागोमाग

निर्यात संबंध आणि कमी वेतनावर काम करणाऱ्या कामगारांमुळे चीनने या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रशियाचा नंबर लागलेला आहे.  जगातील सर्वात मोठे वायू साठे तसेच उर्जा महासत्ता म्हणून रशियाची ख्याती आहे. त्यामुळे रशियाने तिसरा नंबर पटकावलेला आहे.

चौथ्या क्रमांकावर युनायटेड किंगडमची वर्णी लागलेली आहे.

या यादीमध्ये जर्मनीने पाचवे स्थान पटकावले आहे. जर्मनी हा देश जड उद्योगांसाठी मजबूत संसाधने असलेल्या G7 देशांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे.

पर्यटनाच्या जोरावर तसेच तांत्रिक प्रगतीच्या आधारावर फोर्ब्सच्या यादीत दक्षिण कोरियाने सहाव्या क्रमांकावर स्थान निश्चित केलेले आहे.

फ्रान्सचा या यादीमध्ये सातवा क्रमांक लागला आहे. सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला विकसित देश म्हणून हा सातवा क्रमांक फ्रान्सने पटकावला आहे.

लष्कराच्या बाबतीत शक्तिशाली असल्यामुळे जपानला या यादीमध्ये आठवे स्थान मिळालेले आहे. तर सौदी अरेबियाने जगामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तेल साठे असल्यामुळे नववे स्थान पटकावले आहे. दहाव्या स्थानावर अणुऊर्जा क्षमता आणि आधुनिक लष्करी तंत्रांच्या ताकदीमुळे, इस्रायलची वर्णी लागली आहे.

Comments are closed.