अय्यरने सामना फिरवला, पण 'मॅन ऑफ द मॅच' ठरला वेगळाच खेळाडू
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला. सामन्यादरम्यान, जोस बटलर फक्त टॉस जिंकू शकला, उर्वरित सामना भारतीय खेळाडूंनी गाजवला. दरम्यान, कमबॅक करणाऱ्या श्रेयस अय्यरने शानदार आक्रमक खेळली. परंतु त्यानंतरही शुबमन गिलची सर्वत्र चर्चा होत आहे. ज्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचे सलामीवीर फलंदाज फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात वादळी पद्धतीने केली. परंतु ते फारवेळ टिकले नाही. लागोपाठ तीन विकेट पडल्यानंतर संघ बॅकफूटला गेला.
संघाला 50 षटकांचा कोटाही खेळता आला नाही. ते फक्त 47.4 षटकांतच सर्वबाद झाले. संपूर्ण संघ एकत्रितपणे फक्त 248 धावा करू शकला. हा लक्ष्य समाधानकारक होता पण आव्हानात्मक नव्हता. यानंतर, जेव्हा भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी जबाबदारी स्वीकारली. चिंताजनक बाब म्हणजे रोहित शर्माचा खराब फॉर्म अजूनही सुरूच आहे. तो फक्त दोन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जयस्वाल, त्याचा पहिला एकदिवसीय सामना खेळत होता. त्याला काही काळ संघर्ष करावा लागला पण तो फक्त 15 धावा करू शकला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने येताच काही शानदार स्ट्रोक खेळले. हा श्रेयसचा नैसर्गिक खेळ नाहीये, पण तो एक स्फोटक खेळी खेळत होता. झटपट अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, तो 59 धावांवर बाद झाला. त्याने 36 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारले.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली. त्याने सावधपणे फलंदाजी केली. शुबमन गिलने प्रथम आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर श्रेयस अय्यरच्या धावसंख्येला मागे टाकले. तो 87 धावा करून बाद झाला. त्याने एकही षटकार मारला नाही. पण त्याच्या बॅटमधून 14 चौकार आले, यावरून शुबमनचा डाव किती नियंत्रित होता हे समजू शकते.
नागपूरमध्ये सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर, श्रेयस अय्यरने पुनरागमन केले, परंतु शुबमन गिलने जास्त धावा केल्या आणि म्हणूनच त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. म्हणजे शुबमन गिल एक हिरो म्हणून उदयास आला. भारताने केवळ 38.4 षटकांत 6 गडी गमावून 251 धावा करून सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडीही घेतली. आता मालिकेतील दुसरा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळला जाईल.
हेही वाचा-
सामन्यानंतर रोहित शर्माचं कडवटं मत, भारताचा विजय महत्त्वाचा, पण…
“हुकलेला पुल, हरवलेली लय”, रोहित शर्माच्या पुनरागमनाची वाट पाहतोय भारत!
नागपूरचा वनडे सामना भारताच्या नावे, इंग्लंडचा दारुण पराभव, गिल-अय्यरची निर्णायक खेळी
Comments are closed.