Congress leader slams mahayuti govt over face reading system at mantralaya in marathi
Wadettiwar On Face Reading : मुंबई : मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने बसवलेली नवी फेस रिडींग प्रणाली सोमवारपासून (3 फेब्रुवारी) कार्यान्वित झाली. पण पहिल्याच दिवशी या यंत्रणेत गोंधळ निर्माण झाल्याने मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याशिवाय मंत्रालयामधील अनेक सरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या नावावर या गोंधळामुळे लेटमार्क लागला. यावरून आता विरोधकांनी सरकारवर तोंडसुख घेतले आहे. सरकारला जनतेची भीती वाटते का असा प्रश्न विचारत शेतकरी, मजूर, सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करता येऊ नये अशी व्यवस्था उभी करणे, हे अन्यायकारक असल्याने ही व्यवस्था बंद करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (congress leader slams mahayuti govt over face reading system at mantralaya)
मंत्रालयाची सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी अद्यायावत फेस रिडींग प्रणाली बसवल्याचा दावा राज्य सरकारने केला. मंत्रालयात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंत्रालयतील प्रवेश फेस रिडींग (FRS) आणि आरएफआयडी (RFID) कार्डच्या आधारे दिला जाणार आहे. त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने 10 हजार 500 अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा तपशील या प्रणालीमध्ये फीड केला आहे. त्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या कंपनीने मंत्रालयातील सर्व प्रवेशद्वारांवर फेस रिडिंग यंत्रणा बसवली आहे. हे तंत्रज्ञान सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आले. पण, पहिल्याच दिवशी अनेक सरकारी अधिकाऱ्यांचे चेहरे ओळखले जात नसल्याने त्यांना रांगेत उभे राहावे लागत होते.
हेही वाचा – Delhi Exit Poll 2025 : दिल्ली में अब की बार, काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे –
मंत्रालय हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे ठिकाण मानले जाते आणि त्यामुळे आस्थापनांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयात अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठीच ही नवी प्रवेश प्रणाली बसवण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या प्रवेशासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही. मात्र, या सगळ्यात मोठा फटका हा आपल्या कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना बसतो आहे. त्यामुळेच, मंत्रालयातील चेहरा पडताळणी व्यवस्था बंद करावी, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मिळावा, अशी आमची मागणी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
मंत्रालयातील चेहरा पडताळणी व्यवस्था बंद करावी, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मिळावा.
मंत्रालयात प्रवेशासाठी आता चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यावी ही आमची मागणी आहे.
तालुका किंवा…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 5, 2025
तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रश्न सुटले नाहीत तर सामान्य जनता मंत्रालयात मंत्री, सचिव यांना भेटण्यासाठी, आपल्या व्यथा मांडण्यासाठी येतात. पण महायुती सरकारला जनतेची भीती का वाटते? मंत्री,सत्ताधारी आमदार यांच्या जवळचे कंत्राटदार, दलाल यांना मंत्रालयात सहज प्रवेश मिळतो पण शेतकरी, मजूर , सामान्य जनतेला मात्र प्रवेश करता येऊ नये अशी व्यवस्था उभी केली आहे हे अन्यायकारक असल्याने ही व्यवस्था बंद करण्यात यावी, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा – Nanded : उपचारासाठी लोकांनी तुमच्या निधीची वाट पहायची का? नांदेड मृत्यूतांडव प्रकरणी न्यायालयाचा सवाल
Comments are closed.