Shirish Maharaj apologizes to his wife in suicide note
संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. शिरीष मोरे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. यानंतर आता शिरष मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत. यातील एका चिठ्ठीत त्यांनी होणाऱ्या बायकोची माफी मागितली आहे.
पिंपरी चिंचवड : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. शिरीष मोरे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. यानंतर आता शिरष मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत. यातील एका चिठ्ठीत त्यांनी होणाऱ्या बायकोची माफी मागितली आहे. (Shirish Maharaj apologizes to his wife in suicide note)
शिरीष महाराज यांनी होणाऱ्या बायकोच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले की, “माझी लाडकी पिनू, प्रियांका… खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी आता जातो आहे. तुझ्यासोबत थोडा काही काळ घालवायचा होता, पण तुला भेटून ही चूक करत आहे. त्यामुळे हात जोडून मी तुझी माफी मागतो. त्यामुळे मला माफ कर. कारण आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. त्यामुळे मला माफ कर, कारण तुझी सगळी स्वप्नं तोडून मी जातोय, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियांकाचे लग्न लावून देण्याची केली विनंती
शिरीष मोरे यांनी म्हटले की, कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं, खरं तर सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस, निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल, पण आता जप स्वत:ला. माझ्यासाठी एवढा काळ थांबलीस, पण आता मीच नसेल त्यामुळे थांबू नकोस. पुढे जा, खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे मला माफ कर… तुझाच अहो… शिरीष.” आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका. तिला कधी वेळच देता आला नाही. परंतु तिच्यासाठी आता चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही, अशी विनंती त्यांनी मित्रांना उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत केली आहे.
हेही वाचा – Nanded : उपचारासाठी लोकांनी तुमच्या निधीची वाट पहायची का? नांदेड मृत्यूतांडव प्रकरणी न्यायालयाचा सवाल
Comments are closed.