Shiv Sene Thackeray Group MP Press at delhi slams dcm eknath Shinde


शिवसेनेच्या ऑपेरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटातील एकून 9 खासदारांपैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे.

दिल्ली : शिवसेनेच्या ऑपेरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटातील एकून 9 खासदारांपैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आज (7 फेब्रुवारी) शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या खासदारांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. (Shiv Sene Thackeray Group MP Press at delhi slams dcm eknath Shinde)

नेमकं काय म्हणाले ठाकरेंचे खासदार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या दिल्लीत निवासस्थानी ठाकरेंच्या खासदारांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह बाकी खासदार उपस्थित होते. “मुळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यांचं सरकारमध्ये आपापसात गंभीर वाद सुरू आहेत. यावेळी लक्ष वळवण्याचे प्रयत्न केलं जात आहेत. त्या प्रयत्नांनुसार जाणीवपूर्वक आज सकाळी सात वाजल्यापासून कोणीतरी बातम्या सोडल्या आहेत. सरकारमध्ये येऊन सुद्धा रोज नवीन-नवीन बातम्या दिल्या जात आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. अशा बातम्या सातत्याने दिसत असल्याने मुद्दाम ही फूडी सोडण्यात आलेली आहे”, असे म्हणत लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली.

“काही दिवसांपूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्धाटन झालं. आम्हाला संसदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यलय मिळालं. या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं. त्यावेळी सर्व खासदार उपस्थित होते. आताही सर्व खासदार उपस्थित आहेत. म्हणूनच आम्ही एकत्र आलोय. आमची वज्रमुठ आहे. टायगर झिंदा है… असे सगळे आहेत”, असेही अरविंद सावंत म्हणाले.

“टप्प्याटप्प्याने ठाकरेंचे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार सांगतात. पण त्यांच्यातत पक्षातील काही खासदार आणि आमदार त्यांची साथ सोडणार होते. एक त्यांच्याच पक्षातील आमदार काही आमदारांनी घेऊन पक्ष सोडतोय, अशी बातमी होती. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. पण पुढे या बातमीचं काय झालं, त्या बातमीतून लोकांना वळवायचं असेल, तर आमच्या खासदारांवर बोलायचं. लोकांमध्ये ठाकरेंच्या खासदारांबाबत संभ्रम निर्माण करण्याच प्रयत्न केला जात आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो”, असेही खासदार अरविंद सावंत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Sanjay Raut : सरकारच्या तिजोरीत पैसे नाही, हळूहळू लाडक्या बहिणींना योजनेतून गाळलं जाणार – संजय राऊत



Source link

Comments are closed.