Beauty Tips : मेकअपनंतर चेहऱ्यावर येतात पिंपल्स?
मेकअपनंतर चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही खूप सामान्य समस्या झाली आहे. मेकअपमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो. त्या केमिकल्समुळे आपल्या चेहऱ्यावर लगेच पिंपल्स येऊ लागतात. हे पिंपल्स कमी करण्यासाठी आपण अनेक प्रॉडक्ट्सचा वापर करतो. बऱ्याचदा या प्रॉडक्ट्समूळे समस्या कमी होण्याऐवजी अजून वाढते. आज आपण जाणून घेऊयात पिंपल्सची समस्या दूर कशी करायची.
पिंपल्स का येतात ?
मेकअप व्यवस्थित न काढणे
चेहऱ्यावरून मेकअप पूर्णपणे काढून टाकणे खूप महत्वाचे असते. चेहऱ्यावर दीर्घकाळ मेकअप तसाच राहिला तर चेहऱ्यावर धूळ जमा होऊन ही समस्या अजून वाढते. जर मेकअप रात्रभर चेहऱ्यावर ठेवला तर छिद्रांमध्ये जाऊन त्वचेला नुकसान पोहोचू शकते
वारंवार मेकअप करणे
जर तुम्ही वारंवार मेकअप करत असाल तर तुम्हाला ओपन पोर्सची समस्या वाढू शकते आणि चेहऱ्यावर तेल निर्माण होते. त्यामुळे लगेच पिंपल्स येऊ लागतात.
चुकीचे मेकअप प्रोडक्टस वापरणे
बऱ्याचदा काही मेकअपमध्ये जास्त प्रमाणात केमिक्स वापरले जाते त्यामुळे आपली त्वचा लगेच खराब होऊ शकते. मुरुमांची समस्या उद्भवते.
पिंपल्सची समस्या अशी दूर करा
त्वचेप्रमाणे मेकअप प्रोडक्सची निवड करा
त्वचेप्रमाणे मेकअप प्रोडक्सची निवड केल्याने तुम्हाला पिंपल्स येणार नाही.
मेकअप करताना स्वच्छ ब्रश वापरा
बऱ्याचदा मेकअप करताना अनेक लोक ब्रश स्वच्छ न करता वापरतात . त्यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या निर्माण होतात.
त्वचा मॉइश्चरायझिंग
त्वचा मॉइश्चरायझ करणे अत्यंत गरजेचं असते. त्वचेला मॉइश्चरायझ केल्याने हायड्रेट राहते. त्वचेच्या संबंधित कोणतेही आजर होत नाही.
भरपूर पाणी प्या
भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते . पाण्यामार्फत शरीरातील घाण देखील पूर्णपणे निघून जाते त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाही.
हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्यावर ब्लीच करण्याचे साइड इफेक्ट्स
द्वारा संपादित: प्राची मर्जरेकर
Comments are closed.