पश्चिम रेल्वेवर आज 13 तासांचा जम्बो ब्लॉक
![megablock](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/megablock-696x447.jpg)
पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत जलद मार्गांवर 13 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या अवधीतील तब्बल 194 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल वांद्रे किंवा दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत. जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार असल्याने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे शनिवारी 52 लोकल, तर रविवारी 142 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या तसेच रविवारी सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱया प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Comments are closed.