नवी मुंबईतून 200 कोटींचे ड्रग जप्त; ऑस्ट्रेलियाला पाठवणार होते पार्सल

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने नवी मुंबईत कारवाई करून सुमारे दोनशे कोटींचे ड्रग जप्त केले. जप्त केलेल्या ड्रगमध्ये कोकेन, हायब्रीड गांजाचा समावेश आहे. या प्रकरणी चौघांना एनसीबीने बेडय़ा ठोकल्या आहेत. ड्रगची तस्करी करणारे ते आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्गो पार्सलच्या माध्यमातून हिंदुस्थानात ड्रग आणण्याचा प्रयत्न तस्कर करत आहेत. एनसीबी मुंबई युनिटला नुकतीच माहिती मिळाली. एक आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट हे हिंदुस्थानात अवैधरीत्या ड्रग आणत असल्याचे समजले. माहिती गोळा केल्यानंतर एनसीबीचे पथक नवी मुंबई येथे गेले. तेथून एनसीबीने 11.540 किलो कोकेन, 4.9 किलो हायड्रो पॉनिक गांजा, 200 पाकीट गांजा जप्त केला. त्यानंतर एनसीबीने काहींची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान ड्रग असलेले पार्सल हे मुंबई येथून ऑस्ट्रेलिया येथे पाठवण्यात येणार होते. ते पार्सल नवी मुंबई येथून पॅक करण्यात आले होते.

Comments are closed.