नवशिक्या ड्रायव्हरने महिला विद्यार्थ्यांना कारने चिरडले

अनेक विद्यार्थिनी गंभीर जखमी

सर्कल/ मोराडाबाद

उत्तरप्रदेशच्या मुरादाबामध्ये नवशिक्या चालकाने 100 किमी प्रतितासाच्या वेगाने कार चालवत विद्यार्थिनींना चिरडले आहे. या घटनेत अनेक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विद्यार्थिनींना पाहून खळबळ उडाली. यातील दोन विद्यार्थिनींची प्रकृती नाजुक असल्याचे समजते. लोकांनी कारचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही घटना रामगंगा विहार येथे घडली आहे. तर जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारचालकाने प्रथम विद्यार्थिनींचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांना कारने चिरडले आहे. कारमध्ये 5 युवक होते, घटनेनंतर 4 युवकांनी पळ काढला असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

बलेनो कारमध्ये 5 युवक होते, यातील एक युवक शगूनला ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्य परेजा, दिव्यांशु, उदय, कौशिक यश सिरोही अशी अन्य आरोपींची नावे आहेत. तर दुसरीकडे संबंधित विद्यार्थिनींचा शाळेचा शुक्रवारी लास्ट डे होता, बोर्ड परीक्षेचे ओळखपत्र प्राप्त केल्यावर विद्यार्थिनी घरी परतत असताना पाच युवकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला होता. याचदरम्यान युवकांनी कारचा वेग वाढवून विद्यार्थिनींना चिरडले आहे.

Comments are closed.