दिल्ली विधानसभा निकालाआधी केजरीवालांच्या घरी एसीबीची धाड
![Arvind Kejriwal Delhi](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/Arvind-Kejriwal-Delhi-election-696x447.jpg)
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह यांनी भाजपाने आपल्या आमदारांना प्रत्येकी 15 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला. त्यानंतर आज निकालाच्या आदल्याच दिवशी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या आदेशानंतर एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केजरीवालांच्या घरी धाड टाकली. एसीबीचे पथक सुमारे दीड तास केजरीवालांच्या घराबाहेर होते. त्यानंतर ते रिकाम्या हाताने परतले. दरम्यान, एसीबीने केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
कुठल्याही स्थितीत आणि कुठल्याही मार्गाने दिल्ली जिंकायचीच यासाठी भाजपाने निवडणुकीच्या आधीपासूनच षडयंत्र रचण्यास सुरुवात केली. निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदारांवर पैशांचा पाऊसही पाडला. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर भाजपाने आपचे तोंड बंद करण्यासाठी एसीबी. ईडी. आयटीच्या आडून खोट्या कारवाया सुरू केल्याचे समोर आले आहे.
आज फैसला; कडक पोलीस बंदोबस्त
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, शनिवारी होणार आहे. निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होईल. आम आदमी पक्ष विजयाचा चौकार मारतो की दिल्लीवर २७ वर्षांनंतर भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवतात हे स्पष्ट होईल.
Comments are closed.