‘शेम टू शेम’.. उल्हासनगरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा, वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

उल्हासनगरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा असल्याचे आढळून आले आहे. वाहतूक पोलिसांनी या रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारत कागदपत्रांची झाडाझडती घेतली. त्यावेळी ऑनलाइनच्या कचाट्यातून वाचण्यासाठी एका रिक्षाचालकाने आपल्या गाडीवर सेम टू सेम क्रमांक टाकल्याचे तपासात समोर आले आहे.

उल्हासनगर शहरात दुसऱ्या वाहनांची बनावट नंबर प्लेट वापरत असल्याच्या तक्रारी येताच त्याची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी घेतली. त्यामुळे अशा वाहनांची कसून चौकशी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी सायंकाळी या मोहिमेंतर्गत फॉलवर लाईन परिसरात ट्रॅफिक पोलिसांना MH 05 CG 7082 ही रिक्षा संशयित वाटल्याने त्यांनी या रिक्षाला थांबवले. त्याचवेळी सारख्याच नंबर प्लेटची दुसरी रिक्षा जात असल्याचे बघून त्या रिक्षालाही थांबवून कागदपत्रांची खातरजमा केली. त्यावेळी डोंबिवलीतील रवींद्र पाटील यांच्याकडील कागदपत्रे ही ओरिजनल असल्याचे आणि सुनील पाटील यांनी रिक्षावर लावलेली नंबर प्लेट बनावट असल्याचे समोर आले.

Comments are closed.