Chitra Wagh criticizes Rahul Gandhi on Maharashtra elections
रोज फेक नॅरेटिव्ह पसरवणारे म्हणजे बारामतीच्या मोठ्या ताई (खासदार सुप्रिया सुळे) आणि सर्वज्ञानी रडतरौत (खासदार संजय राऊत) तुमच्या पत्रकार परिषदेला हजर होते, यातच सगळे आले. तुम्ही ‘खोटे बोलणार, पण रेटून बोलणार!’ हे तेव्हाच ठरले, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
(BJP Vs Rahul Gandhi) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानात गैरप्रकार झाल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. महाराष्ट्रातील प्रौढ नागरिकांच्या तुलनेत मतदारांची संख्या जास्त असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. तसेच, अवघ्या पाच महिन्यांत 39 लाख मतदार वाढल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. यावरून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले असले तरी, प्रत्युत्तर देण्यास भाजपा सरसावली आहे. देशाला तुमच्याकडून फारशी अपेक्षा नसल्याचे भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. (Chitra Wagh criticizes Rahul Gandhi on Maharashtra elections)
लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धुळधाण उडाली. तर, दुसरीकडे महायुतीने निर्विवाद बहुमत मिळविले. मात्र, महायुतीचा याच विजयाच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
हेही वाचा – Aaditya Thackeray Vs ECI : विश्वासार्हता धुळीस मिळाली, आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा अभ्यास केला. या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाला आहे, असे म्हणायला वाव आहे. विधानसभा निवडणूक 2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या कालावधीत महाराष्ट्रात 32 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली. पण लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या अवघ्या पाच महिन्यांत 39 लाख नव्या मतदारांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली. याशिवाय, सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढांची संख्या 9.54 कोटी असतानाही, निवडणूक आयोगानुसार राज्यात 9.7 कोटी मतदार आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी ‘X’ या सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी यांचे 18 जानेवारी, 3 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी रोजीचे व्हिडीओ शेअर करून, रोज नवनवीन आकडे उच्चारणार का हो? असा प्रश्न केला आहे. वाढलेल्या मतदारांचा एक आकडा काय तो ठरवा आणि त्या आधारे लढा. रोज फेक नॅरेटिव्ह पसरवणारे म्हणजे बारामतीच्या मोठ्या ताई (खासदार सुप्रिया सुळे) आणि सर्वज्ञानी रडतरौत (खासदार संजय राऊत) तुमच्या पत्रकार परिषदेला हजर होते, यातच सगळे आले. तुम्ही ‘खोटे बोलणार, पण रेटून बोलणार!’ हे तेव्हाच ठरले. त्यात देशालाही तुमच्याकडून फारशी काही अपेक्षा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (BJP Vs Rahul Gandhi: Chitra Wagh criticizes Rahul Gandhi on Maharashtra elections)
हेही वाचा – Sanjay Raut : राजकारणात असताना दिल्ली जिंकायची, हीच पंतप्रधान मोदींची शेवटची इच्छा – संजय राऊत
Comments are closed.