Sanjay Raut On Congress And AAP Arvind Kejriwal Delhi Assembly Election 2025 Results Live Updates
यंदा दिल्ली विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली. इंडिया आघाडीत काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी दिल्ली विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिलेले पाहायला मिळाले. हाती आलेल्या पहिल्या कलांनुसार यावेळी दिल्लीकरांनी आपच्या झाडूला नाकारले असल्याचे पाहायला मिळत असून तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Sanjay Raut On Congress And AAP मुंबई : यंदा दिल्ली विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली. इंडिया आघाडीत काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी दिल्ली विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिलेले पाहायला मिळाले. हाती आलेल्या पहिल्या कलांनुसार यावेळी दिल्लीकरांनी आपच्या झाडूला नाकारले असल्याचे पाहायला मिळत असून तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आप आणि काँग्रेसच्या निवडणूक लढवण्यावरून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढण्यावर भाष्य केलं आहे. (Sanjay Raut On Congress And AAP Arvind Kejriwal Delhi Assembly Election 2025 Results Live Updates)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आप आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढत आहे. त्यावरही भाष्य केलं. त्यानुसार, “आम्हीही पहिल्यापासून सांगत आलो की, काँग्रेस आणि आपचे प्रतिस्पर्धी हे भाजप आहेत. त्यामुळे भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि आप दोघेही लढतात. मात्र वेगवेगळे लढत आहेत. पण जर आप आणि काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवली असती तर, निश्चितच दिल्लीचं गणित वेगळं असतं. पहिल्या एक तासातंच भाजपचा पराभव झाला असता”, असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्ली विधानसभा निवडणुकी संदर्भात येत असलेल्या निकालांवरून एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेले विधान हे नक्कीच काँग्रेस आणि आपला सुनावणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण इंडि आघाडीत असून सुद्धा काँग्रेस आणि आपने एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्याने त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला. कारण हे दोन्ही पक्ष विरोधात लढल्याने यामुळे झालेल्या मतविभागणीचा भाजपाला फायदा झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा “और लड़ो आपस में” अशी पोस्ट करत काँग्रेस आणि आपला सुनावले आहे. तर ओमर अब्दुल्ला यांनी या पोस्टसोबतच एक मीम सुद्धा शेअर केले आहे. ज्यामध्ये एक साधू म्हणतो- “आपापसात लढा, एकमेकांना मारून टाका.”
“काँग्रेसनं दिल्लीत खातं उघडलं अजून काय पाहिजे. खातं उघडण्यासाठीच सर्वजण मैदानात उतरत असतात. पण यातून आपल्याला शिकलं पाहिजे. पहिले पाच वर्ष दिल्लीत आपला काम करू दिलं नाही. आपच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं. आताही आपच्या प्रमुख नेत्यांवर अपराधी गुन्हे दाखल करायचे, त्या गुन्ह्याखाली त्यांना तुरुंगात टाकायचं हा फॉर्म्युला त्यांनी वापरला आहे. महाराष्ट्रातही हाच फॉर्म्युला त्यांनी वापरला होता”, असेही संजय राऊत म्हणाले.
“महारष्ट्राचं पॅटर्न म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधक असलेल्या पक्षातील प्रमुखाला संपवायचं. पूर्णपणे संपवायचं आणि निवडणूक जिंकायची. मतदार काय भाजपला मतदान करतेय, असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे. भाजपला कोणालाच मतदान करायचं नाही. ही जबरदस्ती सुरू आहे”, असं म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.
हेही वाचा – Sanjay Raut : राजकारणात असताना दिल्ली जिंकायची, हीच पंतप्रधान मोदींची शेवटची इच्छा – संजय राऊत
Comments are closed.