दिल्लीत भाजपची मुसंडी, ‘आप’ला मोठा झटका, अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अहंकार आणि अ

दिल्ली निवडणुकीचा निकाल 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) सध्या ट्रेंडनुसार मोठी मुसंडी मारली आहे. भाजप 48 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे.  आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. आप 22 जागांवर आघाडीवर असून काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. आता दिल्लीच्या निकालावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.

अमित शाह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की,  वारंवार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करता येणार नाही, असे दिल्लीतील जनतेने सांगितले आहे. गलिच्छ यमुना, पिण्याचे अस्वच्छ पाणी, तुटलेले रस्ते, तुंबलेली गटारे आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकाने यांना जनतेने त्यांच्या मतांनी प्रतिसाद दिला आहे, असे म्हणत त्यांनी आम आदमी पार्टीसह अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय.

अहंकार आणि अराजकतेचा पराभव

दिल्लीतील खोट्या सरकारचे राज्य संपले. हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे. हा दिल्लीकरांच्या ‘मोदींवरील विश्वासाचा आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनचा विजय आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली, भाजपने आपली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा आणि दिल्लीला जगातील नंबर 1 राजधानी बनविण्याचा निर्धार केला असल्याचे देखील अमित शाह यांनी म्हटले आहे. लबाडी, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ नष्ट करून दिल्लीला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचे काम दिल्लीच्या जनतेने केले आहे. आश्वासने मोडणाऱ्यांना दिल्लीने असा धडा शिकवला आहे, अशी टीका देखील अमित शाह यांनी केली आहे.

दिल्ली आता आदर्श राजधानी बनेल

अमित शाह यांनी पुढे म्हटले आहे की,  महिलांचा आदर असो, अनधिकृत वसाहतीतील रहिवाशांचा स्वाभिमान असो किंवा स्वयंरोजगाराच्या अफाट शक्यता असो, दिल्ली आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श राजधानी बनेल, असे म्हणत त्यांनी दिल्लीतील विजयासाठी काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा

इंडिया आघाडीनेच खंजीर खुपसला, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचं नेमकं कारण समोर; ‘त्या’ 4 हजार मतांनी केला गेम!

अधिक पाहा..

Comments are closed.