अश्विनचं रोहितला पाठबळ! म्हणाला, खऱ्या चॅम्पियनची ओळख….
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात उत्तम पद्धतीने केली. संघाने पहिला सामना 4 विकेट्सने जिंकला. यासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर होत्या, जो बऱ्याच काळापासून मोठी खेळी खेळताना दिसला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही रोहितचा खराब फॉर्म कायम राहिला. जिथे तो 7 चेंडूंचा सामना करत फक्त 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आता, त्याच्या कामगिरीबद्दल, टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक विधान केले आहे. ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की रोहितसाठी हा निश्चितच खूप कठीण काळ आहे.
रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल सांगितले की, हा त्याच्यासाठी खूप कठीण काळ आहे. ज्यामध्ये त्याला त्याच्या टीकाकारांना शांत करण्यासाठी मोठी खेळी खेळावी लागेल. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्ही रोहितच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते त्याच्यासाठी नक्कीच निराशाजनक आहे. त्याला मालिकेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याला समजते की त्याने या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण खारब फाॅर्ममुळे क्रिकेट प्रेक्षक नक्कीच त्याला प्रश्न विचारतील. हा एक कठीण काळ आहे. तुम्ही हे प्रश्न थांबवू शकत नाही.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाची चेंडूसह अद्भुत कामगिरी दिसून आली. ज्यासाठी अश्विननेही त्याचे कौतुक केले आहे. जडेजाच्या कामगिरीबद्दल अश्विन म्हणाला की, जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा आपले मीडिया त्याचे कौतुक करण्यास अपयशी ठरते. जेव्हा आपण हरतो तेव्हा सगळेच खलनायक बनतात. त्याने जो रूटला बाद केले. तो एक चांगला गोलंदाज आहे, दबावाखाली फलंदाजी करतो. आणि तो एक अद्भुत क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षण करताना तो या वयातही मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावू शकतो.
हेही वाचा-
Ranji Trophy; अंशुल कंबोजचा कहर! मुंबईच्या फलंदाजांची घसरगुंडी
पॅट कमिन्सच्या घरी पुन्हा पाळणा हालला! पत्नी बेकीनं दिला गोंडस मुलीला जन्म
सचिनचा विक्रम धोक्यात? कोहलीकडे कटकमध्ये नवा इतिहास रचण्याची संधी!
Comments are closed.