अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला

मिल्किपूर बायपोल परिणामः अयोध्येच्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार चंद्रभानू पासवान आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) उमेदवार अजित प्रसाद हे पिछाडीवर असल्याच्या पाहायला मिळत आहे. मिल्कीपूरमधील या विजयासह भाजपने अयोध्येतील पराभवाचा बदला घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी फैजाबादची जागा जिंकली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अयोध्येत सर्व विकासकामांनंतरही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीतील विजयाचा पुरेपूर फायदा घेतल्याचे दिसून आले. अवधेश प्रसाद यांना अयोध्येचा राजा असे संबोधून भाजपच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम समाजवादी पक्षाने केले होते.

मुख्यमंत्री योगींची मोठी खेळी

अयोध्येतून अवधेश प्रसाद खासदार झाल्यानंतर मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. यानंतर भाजपने मिल्कीपूर पोटनिवडणुकीची जोमाने तयारी सुरु केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी स्वतः मिल्कीपूरला अनेक दौरे केले होते. त्यांनी उत्तर प्रदेशातील सहा मंत्र्यांना मिल्कीपूरला पाठवले होती आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हे सतत निवडणुकीच्या रणनीतीवर लक्ष ठेवून होते.

9 महिन्यात अयोध्येतील पराभवाचा घेतला बदला

तर, भाजपने या जागेवरील सर्व मोठ्या नेत्यांना बाजूला करून चंद्रभानू पासवान यांना निवडणुकीत संधी दिली. याचा मोठा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आले. तसेच मुख्यमंत्री योगी यांनी मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, निवडणुकीच्या शेवटच्या काळात सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील चांगलेच सक्रीय झाले होते. मात्र, आता या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे 9 महिन्यांतच भाजपने अयोध्येत सपाचा बदला घेतल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election 2025) भाजपने आम आदमी पार्टीला जोरदार धक्का देत विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपने दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकावला आहे. तर आपचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे. तर, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झालाय.

आणखी वाचा

Delhi Election Result 2025 : दिल्लीत भाजपची मुसंडी, ‘आप’ला मोठा झटका, अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अहंकार आणि अराजकतेचा…’

अधिक पाहा..

Comments are closed.