आता रस्त्यावर लढाई करणार, 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा; मनोज जरांगे याचा पुन्हा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी थेट रस्त्यावर लढाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच 15 तारखेपासून साकळी उपोषणाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आरोप करत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हा माणूस म्हणजे फक्त चाल टाकणारा माणूस आहे. तू इतका बेईमान होऊ नको, मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको. आम्हाला चॅलेंज देऊ नको. वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

फडणवीसांनी खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं. आम्ही तुला मानलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाही. तुझ्यावर खूप विश्वास होता. मात्र आता आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. सरकारच्या समोरासमोर लढू आणि ती जिंकू. त्यांनी साखळी उपोषणाची दखल नाही घेतली तर बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ येईल. इथे सत्ता आणि दरारा फक्त मराठ्यांचा आहेत. मराठ्यांनी ठरवले तर टायरसुध्दा हलणार नाही. मुंगीसुध्दा रस्ता क्रॉस करु शकणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. एकदा जर आम्ही राज्य जाम करायला सुरुवात केली तर आम्ही उठणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांची जी चाल आहे ती संपत नाही. जातीवादने पछाडलेला माणूस जर कोणी असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आधी जनतेची इज्जत करायला शिका, तेव्हा तुम्ही राजा व्हाल. देवेंद्र फडणवीस हा हतबल झाला होता. रडायची वेळ आली होती. मराठ्यांनी तुला गादीवर बसवलं. तू आधी सन्मान करायला शिक. तेव्हा तुला सन्मान मिळेल. देवेंद्र फडणवीस आम्हाला चॅलेंज देऊ नको. वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील. खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं. आम्ही तुला मानलं होत की आमच्याशी गद्दारी करणार नाही. खूप विश्वास होता तुझ्यावर. मराठा आरक्षणासाठी आमच्या लेकरांनी आत्महत्या केल्या. सरकारपेक्षा मराठा मोठा आहे. हे पुन्हा एकदा दाखवून देऊ. माझ्याशी गद्दारी करु नको. एकही मराठा आमदार म्हणू शकत नाही की आम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही, असेही जरांगे यांनी ठणकावले.

येत्या 15 तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार आहे. हे टप्प्याटप्याने अजून वाढत जाईल. बेमुदत साखळी उपोषण सुरू होईल, आम्हाला शिकवू नका. तू गोरगरिबांच्या कष्टांचा तळतळाट घेऊ नको. साखळी उपोषण बेमुदत असणार आहे. आम्ही काही गावं निवडणार असून पाच दहा जण रोज येऊन बसणार आहे. आता पुन्हा एकदा दाखवून देऊ की मराठे काय आहेत. आता यावेळेस आम्ही माघारी फिरणार नाही. मग आता काहीही होऊ द्या, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

Comments are closed.