कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्
दिल्ली निवडणुकीचा निकाल 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. भाजप 48 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेस दिल्लीत एकाही जागेवर आघाडीवर नाही. आता यावरून माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीच्या मतदारांचे अभिनंदन. कारण जे काँग्रेसवाले कुंभ मेळ्याला मानत नाही, जे कुंभमेळ्याच्या स्नानाला मानत नाहीत. सनातन धर्माला मानत नाहीत. हिंदुस्थानच्या हिंदू लोकांना मानत नाही. राम भगवानांना मानत नाही, असे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या पक्षाचे खाते सुद्धा दिल्लीत उघडलं नाही. तसेच जे खोट्याची राजनीती करतात, असे केजरीवाल ज्यांना स्वतःलाही निवडून आणता शकले नाही. त्यांच्या पक्षाची आज दयनीय परिस्थिती झाली आहे. राहुल गांधी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवाल या दोघांना दिल्लीतील मतदारांनी चोख उत्तर दिल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय.
भ्रष्टाचाराला खतपाणी देणाऱ्यांना जनतेने नाकारलं : अमोल मिटकरी
दरम्यान, दिल्लीच्या निकालावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज दिल्लीच्या भ्रष्टाचारी चेहऱ्याला जनतेने नाकारलं आणि भारतीय जनता पार्टीकडे कौल दिला आहे. गेल्या दहा वर्षापासून आपची सत्ता ही दिल्लीत होती. पण जनतेलाही त्या ठिकाणी परिवर्तन पाहिजे होतं. भ्रष्टाचाराला खतपाणी देणाऱ्या आपला जनतेने नाकारलय. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल मान्य केला पाहिजे. नाहीतर पुन्हा EVM वर खापर फोडून आपचे नेते मोकळे होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते 23 जागा दिल्लीत उभ्या केल्या होत्या. त्या ठिकाणी तीन टक्के मतदान आम्हाला मिळालं. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यावी त्या ठिकाणी राष्ट्रवादी शून्य होती. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या मतांची टक्केवारी तीन टक्क्यांवर आणून त्या स्टेटसला मानलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाय रोवण्याची सुरुवात आता दिल्लीतून झालीय, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Anna Hazare VIDEO : एवढं प्रेम केलं तुमच्यावरती… केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले
अधिक पाहा..
Comments are closed.