पुण्यातील भुकूम येथील सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट; NDA नजीकच्या परिसरातील घटना

बातम्या ठेवा: पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी मधील आयरिस- 3 या सोसायटीच्या लिफ्टबाहेर पाकिस्तानी चलनामधील नोट (Pakistani Currency) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या सोसायटीमध्ये ही नोट आढळली आहे ती सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (NDA) हद्दीपासून अगदी काही मीटर अंतरावर आहे. याबाबत सोसायटी चे चेअरमन सहदेव यादव यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये (Pune Police) अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना केली आहे.

सखोल चौकशी करण्याची स्थानिकांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार,  सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर ही नोट पडलेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने लगेच बावधन येथील पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी जाऊन अर्ज दिला आहे. पाकिस्तानी चलनातील सापडलेली नोट ही वापरातील असून ती अनेक वेळा वापरली असल्याचे तिच्या एकूण स्थितीवरून दिसते. ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली की आपल्या देशामध्ये कोणाकडून आली, याचा तपास होण्याची गरज आहे. परिणामी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ही आता स्थानिकांनी केली आहे. मात्र हा नेमका प्रकार काय हे तपासाअंती कळू शकणार आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाचे टोकाचे पाऊल

पुण्यातील (Pune News) एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 19 वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पोलीस वसाहतीत राहत्या घरी गळफास लावून त्याने आत्महत्या केली आहे. ऋषिकेश कोकणे अस 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांना एक वीडियो सापडला आहे. त्यावरून प्रेमभंग आणि नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, आई वडील घरात नसताना त्याने ही आत्महत्या केली आहे. तर  ऋषिकेश बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस (Pune Police)  करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.