फिलिप्सने पाकिस्तानला ठोकले! शतकी खेळीने शेवटच्या षटकांत सामन्याची दिशा बदलली

Pakistan vs New Zealand; शनिवारी त्रिकोणी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य दिले. यादरम्यान ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडसाठी स्फोटक फलंदाजी केली. त्याने 7 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद शतक झळकावले. फिलिप्सने शेवटच्या षटकांमध्ये सामन्याची दिशा बदलली. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच झोडपले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी अर्धशतके झळकावली.

सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान संघाने मर्यादित 50 षटकांत ६ गडी गमावून 330 धावा केल्या. संघाकडून रचिन रवींद्र आणि विल यंग सलामीला आले. यंग 4 धावा करून बाद झाला. तर रचिन 25 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डाव सांभाळत विल्यमसनने 7 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. तर डॅरिल मिशेलने 4 षटकार आणि 2 चौकारांसह 81 धावांची मोलाची खेळी खेळली.

संघाकडून ग्लेन फिलिप्स सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने 74 चेंडूंचा सामना करत नाबाद 106 धावा केल्या. फिलिप्सने या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याने डावाच्या शेवटच्या षटकात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. हा शाहीन आफ्रिदीचा ओव्हर होता. या षटकात आफ्रिदीने एकूण 25 धावा दिल्या.

पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटके गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने 88 धावा देऊन 3 बळी घेतले. अबरार अहमदने 10 षटकांत 41 धावा देत 2 बळी घेतले. हरिस रौफ संघासाठी खूप किफायतशीर ठरला. त्याने 6.2 षटकांत 23 धावा देत 1 बळी घेतला. नसीम शाहला एकही विकेट मिळाली नाही. त्याने 10 षटकांत 70 धावा दिल्या. सलमान आगाने 4.4 षटके टाकली. ज्यात त्याने 31 धावा दिल्या. मात्र, त्याला एकही विकेट घेता आली नाही.

हेही वाचा-

विराट कोहलीच्या फिटनेसवर मोठी बातमी! दुसऱ्या वनडेसाठी उपलब्ध?
सलग दुसरे शतक! करुण नायरची रणजीत धडाकेबाज कामगिरी, टीम इंडियात कमबॅक कधी?
“विजयाची आस, भक्तीचा प्रकाश!” कटक वनडेपूर्वी भारतीय खेळाडू भगवान जगन्नाथच्या चरणी लीन

Comments are closed.