कटकच्या मैदानावर भारताचा दबदबा, विरोधकांचा पराभव निश्चित! पाहा आकडेवारी
INDIA VS ENGLAND; भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी, 9 फेब्रुवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघाने मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका खिश्यात टाकायची आहे. भारतीय संघाकडे स्टार खेळाडूंची फाैज आहे. जी काही क्षणात सामन्याचा प्रवाह बदलू शकतात. गुडघ्याच्या दुखण्यामुळे विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला नाही. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या पुनरागमनाची पूर्ण शक्यता आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी, कटकच्या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया.
भारताने शेवटचा 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कटक येथे एकदिवसीय सामना गमावला होता. ज्यात भारताला चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, टीम इंडियाने गेल्या 23 वर्षांत कटकच्या मैदानावर 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. कटकचे मैदान भारतीय संघाचा अजिंक्य किल्ला आहे. जिथे विरोधी संघ भारताविरुद्ध पूर्णपणे पराभूत होतात.
टीम इंडियाने 1982 मध्ये कटकच्या बाराबती क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला, जो भारताने पाच विकेट्सनी जिंकला. कटकच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण पाच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने तीन तर इंग्लिश संघाने दोन सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाने आतापर्यंत कटकच्या मैदानावर एकूण 17 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने 13 जिंकले आहेत आणि चार सामने गमावले आहेत. या मैदानावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दोन आणि न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी एक वनडे सामने गमावले आहेत.
इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या वनडेसाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी
हेही वाचा-
फिलिप्सने पाकिस्तानला ठोकले! शतकी खेळीने शेवटच्या षटकांत सामन्याची दिशा बदलली
सलग दुसरे शतक! करुण नायरची रणजीत धडाकेबाज कामगिरी, टीम इंडियात कमबॅक कधी?
“विजयाची आस, भक्तीचा प्रकाश!” कटक वनडेपूर्वी भारतीय खेळाडू भगवान जगन्नाथच्या चरणी लीन
Comments are closed.