चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकण्यापेक्षा भारताला हरवणे महत्वाचे, पहा काय म्हणाले पाकिस्तानचे PM?
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानदाखाली खेळली जाणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी आता काही आठवडे शिल्लक आहेत. यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. पण कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघांचा सामना (23 फेब्रुवारी) रोजी रंगणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी नव्याने तयार केलेल्या गद्दाफी स्टेडियमच्या उद्घाटन समारंभात म्हटले की, “आमचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांनी अलीकडच्या काळात चांगले प्रर्दशन केले आहे, पण त्यांच्या समोर आता खरी आव्हाने ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे नाही, तर दुबईतील सामन्यात आपल्या चिरप्रतिद्वंदी भारताला हरवणे असेल. पाकिस्तानच्या संघाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे.”
(भारत विरूद्ध पाकिस्तान) संघात क्रिकेटमधील स्पर्धांचा मोठा इतिहास आहे. 90च्या दशकापासून भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानचा भारताविरुद्धचा शेवटचा विजय 2021 मध्ये दुबई येथे झालेल्या टी20 विश्वचषकात होता. दरम्यान यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेत पाकिस्तान संघ गतविजेता आहे, 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या या मेगा स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवून जेतेपदावर नाव कोरले होते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारत आणि पाकिस्तान संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा
पाकिस्तान- मोहमद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान अली आगा (उपकर्णधार), शाहीन आफ्रिदी, अब्दुल्ला शफीक, फहीम अशरफ, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, हारीस रौफ, खुशदिल शाह, नसीम शाह, सौद शकील, तय्यब ताहिर, फखर जमान
महत्त्चाच्या बातम्या-
IND vs ENG; दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळणार का?
IND vs ENG; दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? कशी असेल कटकची खेळपट्टी? जाणून घ्या एका क्लिकवर
ग्लेन फिलिप्सचा तडाखा, शाहीनची धुलाई! शेवटच्या षटकात चाैकार-षटकरांचा पाऊस
Comments are closed.