चॅम्पियन्स ट्राॅफीपू्र्वी संघाला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज बाहेर
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. ही मेगा स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाईल. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ (19 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असणार आहेत. परंतु, याआधीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे.
त्रिकोणी मालिकेच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. खरेतर, पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज हारिस रौफ (Haris Rauf) पहिल्या सामन्यात जखमी झाला. दुखापतीमुळे हारिसला सामन्याच्या मध्यातच मैदान सोडावे लागले आणि पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याच्या दुखापतीमुळे पाकिस्तान संघाची चिंता द्विगुणीत झाली आहे. वास्तविक, पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज सॅम अयुब दुखापतीमुळे आधीच चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.
ही संपूर्ण घटना न्यूझीलंडच्या डावाच्या 37व्या षटकात घडली. रौफ हा पाकिस्तानकडून षटक टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूनंतर, रौफला छातीत दुखू लागले आणि त्याला मैदान सोडावे लागले. रौफबद्दल माहिती देताना पीसीबीने सांगितले की, त्याला सौम्य साइड स्ट्रेन आहे आणि वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत आहे. या दुखापतीनंतर रौफ पुन्हा मैदानात परतला नाही आणि गोलंदाजीही केली नाही.
हारिस रौफला या सामन्यात त्याच्या षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. त्याने सामन्यात 6.2 षटके टाकली ज्यामध्ये त्याने 23 धावा देऊन टॉम लॅथमला (Tom Latham) तंबूत पाठवले. रौफच्या दुखापतीमुळे पाकिस्तानी चाहतेही चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकण्यापेक्षा भारताला हरवणे महत्वाचे, पहा काय म्हणाले पाकिस्तानचे PM?
IND vs ENG; दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळणार का?
IND vs ENG; दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? कशी असेल कटकची खेळपट्टी? जाणून घ्या एका क्लिकवर
Comments are closed.