Eknath Shinde reaction on the results of the Delhi Assembly elections
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी समोर आली नसली तरी भाजपा या निवडणुकीत विजयी होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालामध्ये भाजपाने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलवले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे 2020 प्रमाणेच काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही. तर दुसरीकडे आपचे दोन मोठे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी समोर आली नसली तरी भाजपा या निवडणुकीत विजयी होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे अभिनंदन केले आहे. (मराठी reaction on the results of the Delhi Assembly elections)
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत मोदींच्या गॅरंटीची कमाल आहे, असे म्हणत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा – Rohit Pawar : इगोमुळे दिल्लीत काँग्रेस-आपचा पराभव; रोहित पवारांच्या कानपिचक्या
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, दिल्लीकरांवरचे गेली 10 वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान आणि मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केले आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांचेही शिंदेंनी आभार मानले आहे.
आपला देश आता आर्थिक महासत्ता होणार
एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. त्यामुळे आता आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, असे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.
हेही वाचा – BJP Vs Rahul Gandhi : देशाला तुमच्याकडून फारशी अपेक्षा नाही, चित्रा वाघांचा राहुल गांधींना टोला
Comments are closed.