कोळीवाडे, गावठाणांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण नाही

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वेक्षण खासगी व्यक्ती, विकासक वा इतर कोणत्याही संस्थांकडून करण्यात येत नसून ते झोपु प्राधिकरणाकडून करण्यात येत असल्याचे झोपु प्राधिकरणाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांमध्ये झोपु प्राधिकरणाकडून कोणतेही बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार नाही, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.