बंगलोरमधील एका व्यावसायिकाने 25 कोटी रुपयांची फसवणूक केली.
पाच जणांविरुद्ध एफआयआर : कॅसिनोमध्ये गुंतवणुकीचे आमिष
प्रतिनिधी/ बेंगळूर
कॅसिनोमध्ये गुंतवणूक करून नफा कमविण्याचे आश्वासन देऊन बेंगळूरमधील उद्योजक विवेक हेगडे यांची 25.5 कोटी ऊपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी राहुल तोन्से याने फसवणूक केल्याचा आरोप असून पाच जणांविऊद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राहुल तोन्से, त्याचे वडील रामकृष्ण राव आणि आई राजेश्वरी यांच्यासह पाच जणांविऊद्ध बेंगळूरमधील बसवेश्वरनगर पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी राहुल तोन्सेचे वडील रामकृष्ण राव यांना अटक केली आहे. संजना हिने यापूर्वी इंदिरानगरमध्ये राहुल तोन्सेविऊद्ध तक्रार दाखल केली होती.
गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याची तक्रार संजनाने केली होती. आता विवेक हेगडे आणि त्याच्या मित्रांना 25.5 कोटी ऊपयांना गंडा घातल्याचा आरोप झाला आहे. त्यांना कॅसिनोमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन देऊन कोट्यावधी ऊपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2023 रोजी मित्रांमार्फत विवेकची रामकृष्णशी ओळख झाली. एका उद्योजकाच्या कार्यालयात कर्ज देण्याबाबत एक बैठक झाली. श्रीलंका, दुबईतील काही जणांना व्यवसायांमध्ये नफा झाला आहे, असे सांगून विवेक यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Comments are closed.