'या' स्टार खेळाडूमुळे गौतम गंभीरवर भडकला माजी दिग्गज! म्हणाला…

सध्या भारत-इंग्लंड (India vs England) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवत दोन्ही सामन्यात विजय मिळवला. दरम्यान पहिल्या 2 सामन्यांसाठी भारताने केएल राहुलची (KL Rahul) यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड केली. राहुलची यष्टीमागे कामगिरी चांगली होती पण तो फलंदाजीत काही खास कामगिरी करू शकला नाही.

केएल राहुलच्या खराब कामगिरीवर अनेक लोक टीका करत आहेत पण त्याला काही लोकांचा पाठिंबाही मिळाला आहे. या संदर्भात, 1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी कर्नाटकच्या या फलंदाजाचे समर्थन केले आहे. पण भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर टीका केली आहे. राहुलला 5व्या क्रमांकावर फलंदाजी न करायला लावल्याबद्दल श्रीकांतने नाराजी व्यक्त केली आहे.

2023च्या वनडे विश्वचषकात केएल राहुलने 5व्या क्रमांकावर प्रभावी कामगिरी केली होती, पण तेव्हापासून त्याला या स्थानावर खेळण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या वनडे मालिकेतही राहुलला या क्रमांकावर संधी मिळत नाही. त्याला 6व्या क्रमांकावर पाठवले जात आहे, तर अक्षर पटेलला (Axar Patel) या क्रमांकावर बढती दिली जात आहे.

त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) म्हणाले, “श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, जो भारतासाठी सकारात्मक आहे. पण मला केएल राहुलबद्दल खूप वाईट वाटते. अक्षर पटेल निश्चितच 30-40 धावा करत आहे. पण केएल राहुलसोबत जे काही घडत आहे ते योग्य नाही. त्याच्या रेकॉर्डकडे पहा, त्याने 5व्या क्रमांकावर उत्तम कामगिरी केली आहे, त्याचा रेकॉर्डही चांगला आहे. मला माहित नाही की संघ व्यवस्थापन त्याच्या स्थानाबद्दल काय विचार करत आहे. जर तो 6 किंवा 7व्या क्रमांकावर फलंदाजी करतो तर तो 6 किंवा 7 धावा करतो. हा अन्याय आहे.”

पुढे बोलताना श्रीकांत म्हणाले, “गंभीर तू जे करत आहेस ते बरोबर नाही. हो, परिस्थितीनुसार, भारत अक्षरला पाचव्या क्रमांकावर पाठवू शकतो पण ती कायमस्वरूपी रणनीती असू शकत नाही. जर तू असे बदल करत राहिलास तर काय होईल हे तुला माहिती आहे, एक महत्त्वाचा सामना होईल जिथे सर्व काही बिघडेल, मला अक्षर पटेलबद्दल काहीही अडचण नाही, तो त्याच्या संधींचा पुरेपूर फायदा घेत आहे. पण जर तू राहुलला क्रमवारीत खाली ढकलत असशील तर रिषभ पंतला सहाव्या क्रमांकावर खेळव. राहुलचा आत्मविश्वास का कमी करायचा? जागतिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी हे योग्य आहे का?”

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2025; आयपीएलचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?
Champions Trophy: जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर आज होणार अंतिम निर्णय!
फॅब-4 आणि शतक: विराट, स्मिथ, रूट यांच्या प्रतीक्षेची कहाणी

Comments are closed.