सोन्याच्या दरात तेजीचं सत्र सुरुच, बँकांकडील थकीत सोने तारण कर्जामध्येही वाढ, नवी माहिती समोर
<एक शीर्षक ="नवी दिल्ली" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/new-delhi" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार बँक आणि एनबीएफसीकडील थकित सोने तारण कर्जामध्ये वाढ झाली आहे. यामुळं बँका आणि एनबीएफसीकडून सोने तारण कर्जाच्या एनपीएमध्ये वाढ झाली आहे. निर्मला सीतारामन यांनी शेड्यूल कर्मशिअल बँका शिवाय मिडल लेअर एनबीएफसीकडील सोने तारण कर्जांमध्ये ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेटस बनली आहेत. मार्च 2024 ते जून 2024 दरम्यान 18.14 टक्के वाढ मिळाली आहे. बँकांकडील सोने तारण कर्ज जे एनपीए झालं आहे त्याचं प्रमाण 21.03 टक्क्यांनी वाढलं आहे.
बँकांकडील 30 जून 2024 पर्यंतचे जे कर्ज एनपीए झालं होतं. त्यामध्ये सोने तारण कर्जाचं प्रमाण 0.22 टक्के होतं. मात्र अप्पर लेअर आणि मिडल लेअर एनबीएफसीकडील एनपीए झालेल्या सोने तारण कर्जाचं प्रमाण 2.58 टक्के होतं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही बाब समोर आली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणं सोने तारण कर्जासंबंधी जोखीम कमी करण्यासाठी जे सोनं गहाण ठेवलं जातं त्या सोन्याचं योग्य मूल्यांकन करण आवश्यक आहे, त्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यामुळं तारण ठेवण्यात आलेल्या सोन्याचं नियमित अंतराच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन आणि फेरमूल्यांकन केलं जाईल. यामध्ये अॅसिड चाचणी, टचस्टोन परीक्षण, एक्स रे सारख्या वेगवेग्या पद्धतीनं सोन्याची शुद्धता तपासली जाते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तारण ठेवलेल्या सोन्याचं मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल अप्रेजरचं पॅनल बनवणे, सोन्याच्या मूल्यांकन प्रक्रिया सीसीटीव्हीमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थिती केलं जातं. याशिवाय सोने तारण कर्ज नियामकांच्या मार्गदर्शक सूचना आणि अंतर्गत धोरणानुसार ऑडिट केलं जातं.
एखादा ग्राहक सोने तारण कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरला तर तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव केला जातो. मात्र, त्यावेळी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन कर्ज परतफेडीसाठी योग्य वेळ दिला जातो.
निर्मला सीतारामण यांनी सोने तारण कर्जातील जोखीम कमी करण्यासाठी 1 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान घेण्यात आलेल्या सोने तारण कर्जाचा आढावा घेतला जाईल. यामध्ये तारण ठेवलेलं सोनं, व्याज दरांची समीक्षा आणि कर्जदाराकडून घेतलेल्या इतर चार्जेसची समीक्षा केली जाईल.
आरबीआयनं 30 सप्टेंबर 2024 ला सोने तारण कर्जाचं धोरण आणि प्रक्रिया याचं व्यापक समीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. सोन्याच्या दरातील चढ उतार, मूल्यांकनातील चुकीमुळंहोणारी जोखीम यामुळं सोने तारण कर्ज देणाऱ्या संस्थांच्या हितांच्या संरक्षणासाठी सोन्याच्या मूल्यांकनाच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज न देणे अशी पावलं उचलण्यात आली आहेत.
इतर बातम्या :
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/sip-risk-if-if- मॅनेजर्स-टॅक-वायरॉन्ग-डिसिजन-एट-व्होंग-टाइम-सिप-विल-डॅन्जरस-फॉर-इनव्हेस्टर्स-चेक-डिटेल -1343679">SIP Investment :…तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा ‘तो’ निर्णय ठरेल चुकीचा…
Comments are closed.