Complaint filed with Pune Police regarding kidnapping of Tanaji Sawant son


शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा ऋषिराज सावंत हा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी आता पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे.

पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा ऋषिराज सावंत हा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाला आहे. विमानतळावरून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून अपहरण झाल्याची माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली होती. यानंतर तक्रार दाखल करत ऋषिराज सावंत यांचा शोध घेतला जात आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे लगेच पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. याप्रकरणी आता पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे. (Complaint filed with Pune Police regarding kidnapping of Tanaji Sawant son)

तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांचा मुलगा कसा बेपत्ता झाला? त्याचे अपहरण झाले असेल तर कोणी केले? याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला. तसेच जिथे घटना घडली तेथील आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. तसेच काही पोलीस अधिकारी कात्रज येथील तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्या मुलाबरोबर आणखी कोण होतं का? याची चौकशी पोलीस करत होते. यानंतर तानाजी सावंत हे स्वत: पुणे पोलीस कंट्रोल रुमला पोहचले आणि त्यांनी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांना घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

हेही वाचा – Suresh Dhas : ज्यांनी अक्षय शिंदेची बाजू घेतली, त्यांनी आम्हाला शिकवू नये; धसांनी आव्हाडांना सुनावले

रंजन कुमार शर्मा म्हणाले की, पोलीस कंट्रोल रुमला आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की, तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतही कुठेतरी घेऊन गेले आहे. यानंतर तत्काळ पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यानंतर तातडीने ऋषिराज सावंत यांची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऋषिराज सावंत हे विमानाने गेले आहेत. विमान कोणत्या दिशेने चालले आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ऋषिराज सावंत यांना परत पुण्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी सिंगल रोड पोलीस स्टेशनला अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच त्याअनुषंगाने क्राइम ब्रांचकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात येत आहे. सध्या प्राथमिक माहिती एवढीच आहे. शेवटी जी काही माहिती मिळेल, ती पत्रकार परिषदेतून किंवा पत्रकारांच्या ग्रुपवरून देण्यात येईल. याप्रकरणी वेगवेगळ्या दृष्टीकोणातून प्रयत्न सुरू आहेत. ऋषिराज सावंत हे कसे सुखरूप परत येतील, यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा – Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा मुलगा दहावीला नापास, ठाकरेंनी सांगितला शाळेतला किस्सा



Source link

Comments are closed.