माजी क्रिकेटपटूची गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावर मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
सध्या भारतीय संघ इंग्लंडसोबत 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या प्रशिक्षणावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, जर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाला तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मोठे बदल दिसून येतील असे आधीच मानले जात होते. मात्र, आता माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) गौतम गंभीरवर मोठे विधान केले आहे.
झहीर खानचा असा विश्वास आहे की, जास्त बदल आणि लवचिकता संघात असुरक्षिततेची भावना निर्माण करेल. तसेच, ते संघाचे नुकसान करू शकते. जर तुम्ही संघात बदल केले तर काही हरकत नाही, पण तुम्हाला काही नियम पाळावे लागतील.
झहीर खान (Zaheer Khan) म्हणाला की, “संघात बदल करताना काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मुख्य खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. तुम्ही म्हणालात की तुमच्यात लवचिकता असावी, नंबर एक आणि दोन निश्चित होतील, पण बाकीचे लवचिक असतील. जर तुम्ही असे केले, तर तुम्हाला नियमांमध्ये राहावे लागेल. काही प्रोटोकॉल आहेत जे पाळावे लागतात. तसेच गोष्टी सुधारण्यासाठी काही संभाषण होणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर तुम्ही असुरक्षितता निर्माण करत आहात, जी भविष्यात संघाच्या हिताची राहणार नाही.”
याशिवाय, झहीर खानने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि गौतम गंभीर यांच्या कोचिंग शैलीवर भाष्य केले. झहीर खान म्हणाला की, “जर तुम्ही राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांच्या मानसिकतेची तुलना केली तर ही परिस्थिती सामान्य नाही. गौतम गंभीरच्या या नवीन प्रयोगाचा भारतीय संघाला फायदा होतो की तोटा होतो हे येणारा काळच सांगेल. असो, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ कसा कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.”
भारत-इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी दाखवत दोन्ही सामन्यात विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता दोन्ही संघातील तिसरा आणि मालिकेतील शेवटचा वनडे सामना उद्या (12 फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या एका क्लिकवर
Ranji Trophy; अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाने बीसीसीआयचे लक्ष वेधले
IPL 2025; आयपीएलचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?
Comments are closed.