देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० लाडक्या पैलवान बहिणीं'च्या कुस्त्या
जळगाव, दि. ११ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या (११ फेब्रुवारी) रोजी ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ चा नारा देत ५० लाडक्या ‘पैलवान’ बहिणींच्या कुस्त्याही रंगणार आहेत. एवढेच नव्हे प्रारंभ आणि समारोप महिला कुस्तीने केला जाणार आहे. कुस्तीच्या इतिहासात महिला कुस्तीपटूंना असा सन्मान प्रथमच दिला जात असल्याची स्फूर्तिदायक माहिती संयोजक समितीचे प्रमुख हिंदकेसरी रोहित पाटील यांनी दिली.
प्रथमच ९ देशांच्या मल्लांचा कुस्ती महामुकाबला!
या महामुकाबल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या कुस्ती इतिहासात प्रथमच तब्बल ९ देशांचे नामवंत महिला आणि पुरुष मल्ल एकाच मंचावर भिडणार आहेत. भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे ऑलिंपियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत.
भव्य स्पर्धेत भारतातील नामांकित महिला कुस्तीपटू परदेशी मल्लांविरुद्ध आपली ताकद आजमावणार आहेत. ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी ही एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडणार आहे. तसेच विजय चौधरी (विश्व विजेता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन (एशिया विजेता- उझबेकिस्तान), प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-फ्रान्स), शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन), अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टने (ऑलीम्पियन – रोमानिया), सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन – मोल्दोवा), पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब ( आशियाई पदकविजेता – इराण), हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) वि. पै. इमामुक (वर्ल्ड चॅम्पियन – जॉर्जिया), सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार, ऑलिंपियन) वि. पै.जस्सा (शेर ए पंजाब).
पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी) वि. पै. जॉन्टी गुज्जर (आंतरराष्ट्रीय विजेता- दिल्ली ), वेताळ शेळके (भवानी केसरी – महाराष्ट्र) वि. दिनेश गोलिया (आंतरराष्ट्रीय विजेता- हरियाणा), फ्लोरिन ट्रिपोन (युरोप चॅम्पियन – रोमानिया) वि. महेंद्र गायकवाड़ (उपमहाराष्ट्र केसरी), भूपिन्दर सिंह (भारत केसरी – पंजाब ) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय विजेता-हरियाणा), कमलजित धूमछडी (रुस्तुम ए हिंद – पंजाब) वि. विक्रांत कुमार (राष्ट्रीय विजेता – हरियाणा), सतेंदर मलिक (भारत केसरी- हरियाणा ) वि. योगेश पवार (उप महाराष्ट्र केसरी), बालाराफिक शेख (महाराष्ट्र केसरी) वि. सोनू (हिमाचल केसरी- हरियाणा), हरियाणा माउली जमदाडे (महान भारत केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी-हरियाणा), शिवा चव्हाण (राष्ट्रीय विजेता – महाराष्ट्र) वि. रजत मंडोथी (त्रिमूर्ती केसरी – हरियाणा), मुन्ना झुंजुर्के (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. हरिओमी ट्रॅक्टर (राष्ट्रीय विजेता- दिल्ली), बाळू बोडके (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. मनजीत मेला (राष्ट्रीय विजेता- हरियाणा), वेदांतिका पवार (उपमहाराष्ट्र केसरी) वि. शिवानी मेटकर (राष्ट्रीय विजेती), अपेक्षा पाटील (राष्ट्रीय विजेती ) वि. सोनाली मंडलिक (राष्ट्रीय विजेती)
या २२ प्रमुख लढतीसोबत स्थानिक ३०० महिला आणि पुरुष पैलवानांच्याही जोरदार कुस्त्या पाहायला मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरशा वर्षाव होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी’ हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी दिली. ही स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला जागत, या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चक्रवर्तीच्या कामगिरीला दाद नाही, कॅरेबियन खेळाडूला मिळाला ‘आयसीसी’चा मोठा पुरस्कार
अहमदाबादच्या मैदानावर ‘या’ 3 भारतीय दिग्गजांनी वनडेत केल्या सर्वाधिक धावा
माजी क्रिकेटपटूची गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावर मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
Comments are closed.