Ambadas danve taunt eknath shinde shivsena over uday samant raigad gaurdian minister controversey and disaster management committee
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महायुती सरकार निवडून आले. पण, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला डावलले जातेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळणे, दुसरे म्हणजे मंत्री उदय सामंत यांच्या उद्योग विभागाचे निर्णय अधिकारी परस्परित्या घेत असल्याचे समोर आले. तिसरे म्हणजे आता रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिंदेंच्या आमदारांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे का? असा प्रश्न पडला आहे.
यावरून शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला आहे. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसिलाही सुरू झाला आहे, अशी कोपरखळी अंबादास दानवे यांनी मारली आहे.
हेही वाचा : रायगडवर ‘NCP’चेच वर्चस्व! अजितदादांच्या उपस्थितीत झालेल्या ‘DPDC’च्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांना डावलले?
‘एक्स’ अकाउंटवर ट्विट करत अंबादास दानवे म्हणाले, ” आपत्ती व्यवस्थापन समिती – शिंदे गट बाद.. उद्योग विभागाचे निर्णय – शिंदे गट बाद.. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक – शिंदे गट बाद… सुरुवात झाली आहे.. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसिलाही सुरू झाला आहे!”
१. आपत्ती व्यवस्थापन समिती – शिंदे गट बाद..
२. उद्योग विभागाचे निर्णय – शिंदे गट बाद..
३. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक – शिंदे गट बादसुरुवात झाली आहे.. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे!…
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 11, 2025
आपत्ती व्यवस्थापन समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्याचे बोलले जात होते. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले, “आपत्ती व्यवस्थापन समिती कधी गठीत झाली, मला माहिती नाही. पण, जिथे आपत्ती, संकट, महापूर येते तिथे एकनाथ शिंदे असतो.”
हेही वाचा : 8 दिवसांपूर्वी दुबईवारी, चार्टर्ड प्लेनसाठी 68 लाख, पप्पा रागवतील म्हणून…; सावंतांच्या मुलाची ‘आतली बातमी’
Comments are closed.